Curchorem: 'ही गणेश विसर्जनाची जागा, इथे सांडपाणी प्रकल्प नको'! होडार-कुडचडेवासियांचा विरोध; खारफुटीची कत्तल केल्याचे उघड

Curchorem Sewage Treatment Plant: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय उल्‍लंघने केल्‍याचे निदर्शनास आले असून खारफुटीचीही कत्तल केल्‍याचेही उघडकीस आले आहे.
Curchorem Sewage Treatment Plant
Curchorem Sewage Treatment PlantDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव/केपे: होडार-कुडचडे येथे बांधण्‍यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाला स्‍थानिकांनी विरोध केला असून हा प्रकल्‍प दुसरीकडे हलवावा अन्‍यथा वेगळे मार्ग चोखाळावे लागतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीआरझेड प्राधिकरणाच्‍या अधिकाऱ्यांनी सोमवारी या नियोजित प्रकल्‍पाच्‍या जागेची पाहणी केली.

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय उल्‍लंघने केल्‍याचे निदर्शनास आले असून खारफुटीचीही कत्तल केल्‍याचेही उघडकीस आले आहे. ज्‍या जागेवर हा प्रकल्‍प उभारला जातो ती सार्वजनिक गणेश विसर्जनाची जागा असल्‍याने येथे हा प्रकल्‍प उभारण्‍यास स्‍थानिकांनी विरोध आहे.

या प्रकल्‍पाच्‍या विरोधात पर्यावरण कार्यकर्ते आदित्‍य देसाई यांनी तक्रार केली होती. त्यानुसार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीआरझेड प्राधिकरणाच्‍या अधिकाऱ्यांनी आज या जागेची पाहणी केली. यावेळी आदित्‍य देसाई यांच्‍यासह सुशांत वस्‍त, जेम्‍स फर्नांडिस तसेच नगरसेवक पिंटी होडारकर उपस्‍थित होते.

घरांना धोका, होडारकर

कुडचडेचे नगरसेवक पिंटी (बाळकृष्ण) होडारकर यांनी सांगितले की, नदीचे पात्र मातीने भरल्‍याने पावसात पूर येऊन जवळपासच्‍या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. या नदीपात्रात गणपती विसर्जन केले जाते, तिथे जर सांडपाणी सोडले तर या जागेचे पावित्र्य नष्‍ट होईल. त्‍यामुळे हा प्रकल्‍प ताबडतोब दुसरीकडे हलवावा.

Curchorem Sewage Treatment Plant
Curchorem: बेतमड्डी-कुडचडेत दहशत! स्थानिकांनी दिला 4 गुंडांना बेदम चोप; मारुती कार, सुरा, कोयता, लोखंडी रॉड जप्‍त

प्रकल्‍प दुसरीकडे हलवावा अन्‍यथा...

जेम्‍स फर्नांडिस यांनी सांगितले की, कुडचडेतील हा प्रकल्‍प म्‍हणजे विकासाच्‍या नावाखाली केलेला विध्‍वंस असून हा प्रकल्‍प दुसरीकडे हलवावा अन्‍यथा स्‍थानिकांना वेगळे मार्ग चोखाळावे लागतील, असा इशारा दिला.

Curchorem Sewage Treatment Plant
Shelvon Curchorem: रेल्वेपूलही नको अन् जेटीही नको! शेळवणवासीयांचा विरोध; आमदार काब्राल यांची घेतली भेट

नदीपात्राबरोबरच जैवविविधतेला धोका

याबाबत तक्रारदार आदित्‍य देसाई यांनी सांगितले की, हे काम करताना कंत्राटदाराने बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर खारफुटीची कत्तल केली असून नदीचे पात्रही मातीचा भराव घालून अरुंद केले आहे. झुआरी नदीच्या उपनदीचा हा काठ असून हे पाणलोट क्षेत्र माती आणि काँक्रिटने भरल्‍याने नदीच्या प्रवाहाला अडथळा येण्‍याबरोबरच आसपासच्या जैवविविधतेला थेट धोका निर्माण झाला आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com