Curchorem: बेतमड्डी-कुडचडेत दहशत! स्थानिकांनी दिला 4 गुंडांना बेदम चोप; मारुती कार, सुरा, कोयता, लोखंडी रॉड जप्‍त

Curchorem Betamaddi Crime: : बेतमड्डी-कुडचडे येथे बुधवारी रात्री दहशत निर्माण करण्यासाठी आलेल्या नुवे येथील चार गुंडांना स्थानिक लोकांनी बराच चोप दिला.
Curchorem Crime News
Curchorem Betamaddi CrimeX
Published on
Updated on

केपे: बेतमड्डी-कुडचडे येथे बुधवारी रात्री दहशत निर्माण करण्यासाठी आलेल्या नुवे येथील चार गुंडांना स्थानिक लोकांनी बराच चोप दिला व नंतर कुडचडे पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर गुंडांनी आणलेली एक मारुती कार, मोठा सुरा, कोयता, लोखंडी रॉड आदी साहित्‍य पोलिसांनी जप्त केले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, गावात एक धार्मिक क्रॉस आहे. त्या क्रॉसजवळ घर असलेल्या पण सध्या नुवे येथे स्थायिक झालेल्या कुटुंबातील एका युवकाने आपल्या जागेचे कुंपण त्या क्रॉसच्या अवारातून नेले होते.

मात्र क्रॉसचे फेस्त तोंडावर आल्‍यामुळे गावकऱ्यांनी त्या कुटुंबाला ते कुंपण काढून टाकण्यास सांगितले. पण त्याने नकार दिल्यामुळे गावकऱ्यांनी स्वतःच ते कुंपण काढून टाकण्यास सुरू केले होते. हाच राग मनात धरून असलेल्या त्या युवकाने काल बुधवारी दुपारी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नुवेतील आपल्या चार मित्रांना बेतमड्डी येथे बोलावून घेतले.

Curchorem Crime News
Verca Crime: युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सळ्यांनी वार; वार्का अपहरण प्रकरणातील फरारी संशयिताला अटक

वाद विकोपाला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कुडचडे पोलिसांना प्रचारण करण्यात आले. पण तोपर्यंत ग्रामस्थांनी त्या चारही युवकांना पकडून अर्धनग्न अवस्थेत भरपूर चोप दिला व पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले.

Curchorem Crime News
Goa Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 2.59 कोटींच्या अमली पदार्थांसह बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी तीन स्वीडिश नागरिकांना अटक

क्रॉसच्या आवारातच दारूची पार्टी

नुवे येथील युवकाने ‘त्‍या’ चारही गुंड मित्रांसाठी क्रॉसच्या आवारातच पार्टी आयोजित करून त्यांना भरपूर दारू पाजली. सायंकाळी उशिरा दारूच्या नशेत त्यांनी मुद्दाम हा वाद उकरून काढला आणि दोन स्थानिक युवकांना बेदम मारहाण केली. त्यांच्या गाडीत कोयते, सुरे आणि इतर शस्त्रे असल्याचे समजातच संपूर्ण गाव एकवटला. त्‍यात महिलांचाही समावेश होता. सुमारे दीडशे लोक विरुद्ध चार गुंड असा संघर्ष पेटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com