Shelvon Curchorem: रेल्वेपूलही नको अन् जेटीही नको! शेळवणवासीयांचा विरोध; आमदार काब्राल यांची घेतली भेट

Shelvon Curchorem Protest: शेळवण - कुडचडे भागातील नागरिकांनी आपल्या भागात रेल्वेचा उड्डाण पूलही नको आणि जेटीही नको म्हणून स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेऊन आपला जोरदार विरोध दर्शविला.
Shelvon Curchorem oppose flyover and jetty
Shelvon Curchorem oppose flyover and jettyDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: शेळवण - कुडचडे भागातील नागरिकांनी आपल्या भागात रेल्वेचा उड्डाण पूलही नको आणि जेटीही नको म्हणून स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेऊन आपला जोरदार विरोध दर्शविला. यावेळी आमदार नीलेश काब्राल यांनी स्थानिक जनतेला जे प्रकल्प नको असतील, तर आपणही जनतेच्या बरोबर राहणार असल्याचे मत स्पष्टपणे मांडले.

यापूर्वी शेळवण गावात ‘मेरी-गो-राउंड’ प्रकल्प आणण्याचा जोरदार प्रयत्न केला असता स्थानिक जनतेने तितक्याच प्रमाणात विरोध दर्शवून प्रकल्प रोखून धरला होता, पण आता अचानक त्याच भागातून रेल्वे उड्डाण पूल आणि जेटीच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्याने गावात खळबळ माजली आहे.

या प्रकल्पाला सीआरझेडचा हिरवा कंदील जरी मिळालेला असला, तरी ग्रामस्थांनी एकजूट दाखवून राष्ट्रीय हरीत लवादाकडे दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वीसुद्धा गावातील एकजुटीने ‘मेरी-गो-राउंड’ प्रकल्पाला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले होते.

Shelvon Curchorem oppose flyover and jetty
Curchorem: ..निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हा! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी वेलिंगकरांचे आवाहन; कुडचडेत निर्धार मेळावा

गावात आहे, त्याच जेटीच्या वापरास ग्रामस्थांचा विरोध नाही आणि दुसऱ्या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यासही कोणाचा विरोध नाही. ‘मेरी-गो-राउंड’चे संकट जसे लोकांनी एकत्र येऊन हाकलून लावले होते. त्याच पद्धतीने या प्रकल्पाला विरोध करण्यात येणार असल्याचे पंच मनोज नाईक यांनी सांगितले.

Shelvon Curchorem oppose flyover and jetty
Curchorem: बेतमड्डी-कुडचडेत दहशत! स्थानिकांनी दिला 4 गुंडांना बेदम चोप; मारुती कार, सुरा, कोयता, लोखंडी रॉड जप्‍त

मी जनतेसोबत; काब्राल

आताही तशाच प्रकारचा प्रखर विरोध करून शेळवण गावात येऊ पाहणारे संकट परतवून लावण्यास ग्रामस्थ पुढे सरसवाले आहेत. यासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी आमदार नीलेश काब्राल यांची त्यांनी भेट घेतली असता ते म्हणाले, यापूर्वीसुद्धा आपण शेळवणवासीयांसोबत होतो आणि आतासुद्धा शेळवणवासीयांसोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. जनतेला नको असलेले प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्यास विरोध होणे साहजिकच आहे. स्थानिक लोक विरोध करीत असल्यास त्यांच्या मागे उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे आमदार काब्राल यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com