Vasco : वास्कोतील बॉक्साईट - कोळशाच्या बेकायदेशीर वाहतुकीला स्थानिकांचा विरोध, गोवा फर्स्टने केली 'ही' मागणी

सर्व वाहतूक वाहने ताडपत्रीने झाकलेले असणे आवश्यक, मालाची पातळी कार्गोच्या खाली हवी- गोवा फर्स्ट
Illegal traffic
Illegal trafficDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) च्या गेट क्र. ९ मधून कलावती आई मंदिर, हेडलॅण्ड सडा येथून बॉक्ससाईट आणि कोळशाच्या होणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बॉक्साईट आणि कोळशाच्या रस्त्यावरील गळती, रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण असे बरेच मुद्दे त्यात अधोरेखित केलेले आहेत.

मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) येथे गेट क्रमांक ९ सुरू झाल्यापासून वास्को शहरातून जाणारे सर्व प्रमुख मालवाहतूक करण्यासाठी या गेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बॉक्साईट आणि कोळशाच्या रस्त्यावरील गळती, वाहतूक कोंडीच्या संदर्भात समस्या, रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण आणि गळती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण कक्षने एमपीएला अनेक वेळा ताकीद दिली आहे. परंतु एमपीए कडून ही गळती नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. या प्रकरणी नागरिकांना कोणताही दिलासा दिला जात नसल्याचे गोवा फर्स्टने म्हटले आहे.

Illegal traffic
Goa Government: आता जन्म, मृत्यू प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन, केवळ 'इतक्या' रूपयांत मिळेल सर्टिफिकेट...

सकाळी 7 ते रात्री उशिरापर्यंत आयओसी सर्कल ते कलावती मंदिर दरम्यान वाहतूक पोलीस तैनात नसल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजत असल्याचे गोवा फर्स्टने म्हटले आहे. मुरगावातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ऑफिसला जाणारे लोक प्रवास करतात. शहरातील वाढत्या रहदारीमुळे त्यांना रस्ता ओलांडणे देखील कठीण होते, असे गोवा फर्स्टने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सर्व वाहतूक वाहन ताडपत्रीने झाकलेले असणे आवश्यक आहे, मालाची ढीग पातळी कार्गोच्या उंचीच्या खाली मर्यादित असणे आवश्यक आहे, एमपीए सोडण्यापूर्वी वाहतुकीद्वारे व्हील वॉशिंग स्टेशनचा वापर केला जाईल अशा मागण्या देखील गोवा फर्स्टने केल्या आहेत.

Illegal traffic
Goa Corona Update: गोव्यात आता कोरोनाचे 'इतके' सक्रीय रूग्ण

आयओसी सर्कल ते कलावती मंदिर सडा पर्यंत वाहतूक चालविण्यास बंदराची कोणतीही संमती नसल्यामुळे वास्को शहरावरील निर्बंध हटवण्याची आम्ही अधिकार्‍यांना मागणी करतो. या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी गोवा फर्स्टने केली आहे. तसेच एमपीएला सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com