केळशी समुद्र किनाऱ्याला 'ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र' देण्यास लोकांचा विरोध

ग्रमासभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डेसमंड डायस होते.
Beach
Beach Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: केळशी समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्याच्या सरकारी प्रस्तावाला केळशीवासियांनी विरोध दर्शविला आहे. रविवारी झालेल्या ग्रामसभेत उपस्थितांनी आपला विरोध व्यक्त केला. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिल्यावर स्थानिक व पारंपरिक व्यवसायांच्या विस्थापनांचे काय असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.

Beach
गोव्याच्या मंत्रिमंडळात महिलांना 'नो एंट्री'?

ग्रामपंचायतीने ताबडतोब गोवा कोस्टल झोन मॅनॅजमॅंट ओथोरिटी व पर्यंटन खात्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राला विरोध कळवावा असे सुचित करण्यात आले. या ग्रमासभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डेसमंड डायस होते.

ज्या अर्थी किनाऱ्यावर मो्ठ मोठे टॉवर्स उभारण्याचे काम चालू आहे, त्या अर्थी हा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचीच संकल्पना वाटते असे उपस्थितांनी मत व्यक्त केले. तसेच पर्यटन सुविधा केंद्राची स्थापना करणे म्हणजे ओला व उबेर सारख्या टॅक्सी (Taxi) चालकांना केळशी गावात प्रवेशाला मान्यता असाही त्याचा अर्थ होतो असे लोकांना वाटते.

हे टॉवर आपत्ती प्रणालीची चेतावणी देण्यासाठी बसविण्यात येत आहे व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पध्दतीचा हा एक भाग असल्याचे स्पष्टिकरण सरपंचानी दिले. गेल्या सहा महिन्यात केळशीवासियांनी दुसऱ्यांदा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राला विरोध दर्शविला आहे.

Beach
प्रमोद सावंत मंत्रिमंडळात ख्रिस्ती समाजाला झुकतं माप?

या ग्रामसभेला आमदार वेन्झी व्हिएगश उपस्थित होते. त्यानी केळशीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्र्वासन या प्रसंगी दिले. या गावात जी विकास कामे बंद आहेत किंवा अर्धवट आहेत त्यांना चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असे आमदार व्हिएगश यानी सांगितले.

आमदाराने केळशी पंचायतीसाठी ज्यादा अनुदानाची मागणी सरकारच्या (Government) कानावर घालावी अशी विनंती करण्यात आली. हे अनुदान कचरा विल्हेवाटीसाठी उपयोगी पडेल असेही पंचायतीला वाटते. पंचायतीला लोकांनी भरलेल्या विविध करातुन दहा लाख रुपये मिळाले असे सरपंचानी उपस्थितांना सांगितले. पंचायतीच्या खात्यात वेगवेगळ्या कर भरण्यावरुन व प्रारंभीक शिल्लकद्वारे 4.99 कोटी रुपया जमा होण्याचा अंदाज तर खर्चासाठी 2.74 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com