पणजी: राज्याची अर्थव्यवस्था बिकट असताना करदात्यांच्या पैशातून दुसरे राजभवन बांधण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्थानिक आणि शेतकऱ्यांच्या गटाने मंगळवारी तीव्र विरोध केला. (Local people oppose building of second raj bhavan in Goa)
स्थानिकांनी मागणी केली आहे की हा निधी सरकारी रुग्णालये, शाळेच्या इमारती यासारख्या चांगल्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी वापरला जावा. “आम्हाला राज्यपालांसाठी दुसऱ्या राजवाड्याची गरज नाही,” ते म्हणाले.
काँग्रेसचे संजय बर्डे म्हणाले की, "भाजप सरकार दुसऱ्या राजभवन उभारण्याचा विचार करत आहे. हे खेदजनक आहे. सरकारने हे पैसे लोकांच्या हितासाठी खर्च करावेत." सरकार सध्याचे राजभवन खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देईल, असा संशय बर्डे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यपालांच्या कार्यालयाने पुन्हा स्पष्ट केले आहे की राजभवनची सध्याची इमारत आणि राज्यपालांच्या सचिवालयाची इमारत अबाधित राहील आणि त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.