मांद्रे जुनसवाडा येथे एका शॅकला आग; सात लाखांचे नुकसान

अग्निशमन दलाने तातडीने नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला
FIRE NEWS
FIRE NEWS Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : मांद्रे जुनसवाडा येथे एका शॅकला अचानक आग लागली. या घटनेत शॅकचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या शॅक लक्ष्मीकांत आणि सद्‍गुरू नाईक यांच्या मालकीचा आहे. (A shack fire at Mandre Junaswada; Loss of seven lakhs )

या घटनेची माहिती अग्निशमन दलाने तातडीने हजर होत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत शॅक्समध्ये असलेले चार मोठे फ्रीज, आठ गॅस शेगड्या, गॅस सिलींडर, फर्निचर, स्वयंपाकाचे वस्तू, टेबल, खुर्च्या, भांडी आणि आदी सामान जाळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतल्याने मोठी हानी टळली.

ज्या ठिकाणी ही घटना घडली होती. त्या ठिकाणी रास्ता अरुंद असल्यामुळे अग्निशामक दलाची गाडीआत जाणे कठीण होते. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी लोकांच्या सहकार्याने, आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत शॕक मालकाचे मोठे नुकसान झाले मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि बाजूला कोणते ही नुकसान न होण्यापासून सहकार्य केले.

FIRE NEWS
यासिन मलिकच्या समर्थनार्थ पुन्हा बडबडला शाहिद आफ्रिदी, भारतीय लेगस्पिनरने दिलं चोख प्रत्युत्तर

कोंबड्या घेऊन आलेल्यांना लुटण्याचा प्रयत्न फसला

गडहिंग्लज येथून ब्रॉयलर कोंबड्यांची गोव्यात डिलीव्हरी करण्यासाठी आलेल्या शिवराज पाटील व अन्य तिघांना दमदाटी करून त्यांचे वाहन घेऊन पळ काढलेल्या परशुराम कांबळे व त्याच्या सहकारी मित्रांना (सांगोल्डा) बारा तासाच्या आत मुद्देमाल तसेच वाहनासह ताब्यात घेण्यात साळगाव पोलिसांना यश आले आहे.

साळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज येथील शिवराज पाटील आपल्या अन्य दोघा साथीदारांसह ब्रॉयलर कोंबड्यांची गाडी (क्र. KA-22 C-9320) घेऊन कळंगुटमध्ये डिलीव्हरी करण्यासाठी निघाले असता स्कूटरवरून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या परशुराम कांबळे तसेच अजय देवुसकर (रा. सांगोल्डा) यांनी स्कूटर त्यांच्या जीपगाडी समोर आडवी घातली व खंडणीसाठी त्यांना दमदाटी करीत गाडीची चावी काढून घेतली. यावेळी गाडीचे चालक शिवराज पाटील तसेच संशयितांची बाचाबाची सुरू असतानाच जबरदस्तीने गाडीचा ताबा घेत परशुराम कांबळे व त्याच्या तिघाही साथीदारांनी तेथून पळ काढला होता. मात्र बारा तासाच्या आत मुद्देमाल तसेच वाहनासह ताब्यात घेण्यात साळगाव पोलिसांना यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com