आकेचा नाला पावसापूर्वी न उपसल्यास जवळच्या घरात पाणी शिरण्याची भीती

प्रशासनाने नाला प्राधान्याने उपसण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
Aake Nallah in Madgaon
Aake Nallah in MadgaonDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव शहरातील विविध ठिकाणांच्या गटाराचे पाणी कोकण रेल्वे स्टेशनच्या विरुद्ध दिशेला असलेल्या नाल्याला मिळते. हाच प्रमुख नाला प्रथम उपसला नाही तर मडगाव परिसरातील अनेक घरात पावसाळ्यात सुरुवातीलाच पाणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वप्रथम आकेचा हा नाला उपसण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Aake Nallah in Madgaon
गोव्यात आता वीजबिलांचा चटका, लवकरच दरवाढ होणार

या नाल्याला मडगाव शहरातील अनेक ठिकाणांच्या गटाराचे पाणी मिळत आहे. या नाल्याचे जंक्शन कोकण रेल्वे स्टेशनच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पदपुलाजवळ आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. यासोबतच अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. या दरम्यान एखाद्या वेळी मोठा पाऊस पडल्यास हा नाला साचलेल्या कचऱ्यामुळे तुडुंब भरण्याची भीती व्यक्त होत आहे. या नाल्यात प्लास्टिकचा कचरा, कपडे, काँक्रिट पडलेलं असून त्यात झाडे झुडुपेही वाढलेली आहेत. हा कचरा तातडीने न काढल्यास येथील नाल्यासह गटारे भरुन वाहण्याची शक्यता आहे. तसेच या गटाराजवळ असलेल्या घरांच्या आत पाणी जाण्याची शक्यता आहे.

Aake Nallah in Madgaon
'सोपो कंत्राटदाराकडून थकबाकीची रक्कम त्वरित वसूल करा'

संबंधित नाल्याची सुरुवात आके येथील बाल भवनच्या पाठीमागून होत आहे आणि हा नाला अग्निशमन दलाच्या जवळून बांधण्यात आलेल्या बायपास रस्त्याच्या समांतर रावणफोंड येथील मुख्य जंक्शन पर्यंत जात आहे. पावसाळ्यात या ठिकाणी रस्ते पाण्याखाली जात आहेत असे अनेकवेळा येथे घडलं आहे. येथील घरानाही हा नाला न उपसल्यास धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाल्याची सफाई तातडीने करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com