गोव्यात आता वीजबिलांचा चटका, लवकरच दरवाढ होणार

पुढील 8 दिवसांत अधिसूचना काढणार असल्याची वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak

पणजी : गोव्यात महागाई गगनाला भिडतानाच आता आणखी एक मोठी बातमी गोमंतकीयांची चिंता वाढवणार आहे. गोव्यात वीजबिलामध्ये लवकरच वाढ केली जाणा आहे. पुढील 8 दिवसांमध्ये वीज दरवाढीसंदर्भात अधिसूचना काढणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे.

Goa Electricity
मी तुमच्यापैकीच एक, माझ्याघरीही वीज नाही, गोवा वीज खात्याच्या ट्विटचा नेटवर धुमाकूळ

देशात सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे आधीच विजेची टंचाई जाणवत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात अनेक ठिकाणी लोड शेडिंगही सुरु करण्यात आलं आहे. उद्योजकांनी मागणी केल्यानंतर गोवा सरकारने हालचाली करुन खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे गोव्याच्या उद्योगांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र उद्योजकांनाही ही वीज चढ्या भावानेच मिळत आहे.

Goa Electricity
वादळी वाऱ्यामुळे एकट्या काणकोणमध्ये वीज खात्याचं 6 लाखांचं नुकसान

आता सर्वसामान्य गोवेकरांनाही या वीज दरवाढीची झळ बसण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीच तसे संकेत दिले आहेत. याबाबत लवकरच सरकार अधिसूचना जारी करणार असून त्याची थेट झळ गोमंतकीयांना बसणार आहे.

गोव्यात नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत वीज साहित्याची मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर झाडं उन्मळून पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे गोवा वीज खात्याने 10 कोटींचे साहित्य मागवल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com