
पणजी: वाढत्या तंत्रज्ञान आणि विकासामुळे साक्षरता हा प्रत्येक मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. आजही आपल्या देशातील अनेक राज्ये साक्षरतेत खूप मागे आहेत, परंतु गोवा साक्षरतेत देशात अव्वल ठरला आहे.
यंदा गोवा घटक राज्यदिनी गोव्याला साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले. राज्यातील ९९.२७ टक्के लोकसंख्या साक्षर असल्याचे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा अहवाल आहे.
केंद्र सरकारने उल्लास योजनेअंतर्गत २०३० पर्यंत देशातील सर्व राज्यांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास अजून पाच वर्षे बाकी असतानाच गोवा व मिझोराम ही राज्ये आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाने उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.
साक्षरतेचा अर्थ देशातील अक्षर ओळख नसलेल्या नागरिकांना शिक्षित करून वाचन व लेखन करण्यायोग्य बनवणे होय. एखाद्या देशाचा प्रत्येक नागरिक साक्षर असेल तरच त्या देशाची प्रगती जलद होते. साक्षरतेचा संबंध देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकासाशी संबंधित असल्याने साक्षरता आणि आता डिजिटल साक्षरता ही काळाची गरज ठरत आहे.
८२ पंचायतीची लोकसंख्या १०० टक्के साक्षर
३३ पंचायतीतील साक्षरतेची टक्केवारी ९५ ते ९९.९९ टक्के
७६ पंचायत, १३ नगरपालिका आणि १ महानगरपालिकेतील ६२९९ अक्षर ओळख नसलेल्या नागरिकांची नोंद जीएससीईआरटीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २१३६ नागरिकांना अक्षर ओळख, वाचनाचे धडे देण्यात आले आणि ते परीक्षाही उत्तीर्ण झाले.
राज्यात साक्षरांची संख्या मोठी आहे.ज्यांना अक्षरओळख नाही अशा नागरिकांना शिक्षक पुरवून लेखन, वाचनासंबंधी मातृभाषेतून शिक्षण देण्यात येते. साक्षरतेबाबत राज्य सरकार अधिक गंभीर आहे.
- मेघना शेटगावकर, संचालक, एससीईआरटी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.