Goa Mumbai Highway: गोवा-मुंबई महामार्गावर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई! तळेरे-कणकवली येथे 90 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, वाहनचालकाला अटक

Goa Mumbai Highway Liquor Seizure: गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तळेरे (ता. कणकवली) येथील ओव्हरब्रिजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे.
Goa Mumbai Highway Liquor Seizure
Goa Mumbai HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

ओरोस: गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तळेरे (ता. कणकवली) येथील ओव्हरब्रिजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल ८९ लाख २२ हजार ४०० रुपयांच्या दारूसह एक कोटी नऊ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजस्थानमधील वाहनचालकाला अटक केली. ही कारवाई आज पहाटे झाली.

या विभागाने दिलेली माहिती अशी ः भरारी पथकाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाला संशयावरून थांबवले. कसून तपासणीत बनावट दारू असलेले १०५ बॉक्स आढळले. या दारूसह वीस लाखांचे वाहन, दहा हजारचा मोबाईल असा एकूण सुमारे एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला.

Goa Mumbai Highway Liquor Seizure
एक 'क्लिक' करताच दीड लाख गायब! सायबर चोरट्यानं चिखलीतील ज्येष्ठ नागरिकाला लुटलं; क्रेडिट कार्डचं डिटेल्स देणं पडलं महागात

वाहनचालक मनोहर उदाराम लाल (वय ३२, रा. पानोरिया, ता. चौहटन, जि. बाडमेर, राजस्थान) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. विभागातील निरीक्षक अमित पाडळकर व त्यांच्या पथकाने कारवाई केली. पाडळकर तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com