Goa Monsoon Update: पुढील 3 ते 4 तासात जोरदार बरसणार

गोव्यात (Goa) ऐन सुट्टीच्या दिवशी रविवारी सकाळी तब्बल अडीच तास पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
Goa Monsoon Update
Goa Monsoon Update Dainik Gomantak

पणजी: गोव्यात ऐन सुट्टीच्या दिवशी रविवारी सकाळी तब्बल अडीच तास पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तरीही गतवर्षीच्या तुलनेत राज्यात पावसाची नोंद कमीच राहिली. गतवर्षी 4जुलै रोजी 71.1 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ती यावेळी केवळ 36.5 मि. मी. इतकी आहे. त्यामुळे यंदा अजूनही मान्सून तितका सक्रिय नसल्याचे दिसून येते. (Light to Moderate spells of rain at North Goa and South Goa districts during the next 3-4 hours)

सर्वाधिक पणजीत

पणजीत रविवारी 42.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. पर्जन्यप्रवण पेडणे, साखळी, वाळपई आणि सत्तरी या भागात मात्र पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी राहिले. तुलनेत सांगेमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे कोठेही हानी झाली नाही.

Goa Monsoon Update
Goa Curfew: संचारबंदीची नवी अधिसूचना जारी, हॉटेलचालक खुश तर कसिनो बंदच
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

213.6 मि. मी.

गतवर्षी जुलैच्या पहिल्या चार दिवसांत तब्बल 213.6 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र केवळ 51.7 मी. मी. पाऊस झाला आहे. 2019 मध्ये 71.4 मी.मी. पाऊस झाला होता. पावसाची उघडझाप सुरूच आहे.

Goa Monsoon Update
Goa: डिचोलीत अल्पवयीन मुलीवर "गँगरेप"? परशुराम सेनेच्या आरोपानंतर खळबळ

भातलागवडीसाठी पूरक पाऊस

मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या मशागतीची कामे जवळपास हातावेगळी झाली होती. आता भातलागवडीच्या कामांना अधिक वेग आला आहे. दरम्यान पुढील 3 ते 4 तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com