Calangute Crime: कळंगुट मासळी मार्केट खून प्रकरणातील तीन दोषींना जन्मठेप

न्यायालयाने सुनावली शिक्षा; 2017 मध्ये घडले होते प्रकरण
Calangute Crime | Court
Calangute Crime | Court Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Crime: कळंगुट फिश मार्केट खून खटल्यातील तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जोसेफ सिक्वेरा, सीओन फर्नांडीझ महेश रामपाल (सर्व राहणार कळंगुट) अशी दोषींची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायालय-1मध्ये न्यायाधीश क्षमा जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.

कळंगुटचे पोलिस निरीक्षक, म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास केला. आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Calangute Crime | Court
Goa Statehood Day: काय आहे गोवा घटकराज्य दिन? 7 पॉईंट्समध्ये जाणून घ्या, या दिवसाचे महत्व...

2017 मध्ये घडलेल्या या प्रकरणात कळंगुट मासळी मार्केटमध्ये त्या दिवशी टायरोन नाझरेथ याच्यावर रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना 24 जून 2017 च्या रात्री घडली होती.

चाकू आणि चॉपरने आरोपींनी नाझरेथवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला मापुसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते. डीवायएसपी दळवी व पोलिस पथकाने आरोपींना मोले चेकपोस्टवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले होते.

Calangute Crime | Court
Gomant Vibhushan Award 2023: विनायक खेडेकर, पं. प्रभाकर कारेकर यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान

चाकू आणि चॉपरने आरोपींनी नाझरेथवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला मापुसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते.

डीवायएसपी दळवी व पोलिस पथकाने आरोपींना मोले चेकपोस्टवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले होते. एकूण 19 साक्षीदार तपासले गेले. सरकारी वकिलांच्या पथकात अॅड. फ्रान्सिस नरोना, अॅड. सुनीता नागवेकर, अॅड. अनुराधा तळवलीकर आणि अॅड. रॉय डिसोझा यांचा समावेश होता.

या निकालामुळे अनेक वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईचा शेवट झाला. या निकालाने पीडिताच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी जिवबा दळवी, एएसआय सुभाष मालवणकर, कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर आदींनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com