Gomant Vibhushan Award 2023: विनायक खेडेकर, पं. प्रभाकर कारेकर यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
Gomant Vibhushan Award 2023
Gomant Vibhushan Award 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

Gomant Vibhushan Award 2023: विनायक विष्णू खेडेकर आणि पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांना आज, मंगळवारी गोमंत विभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. गोवा सरकारतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कारर्थींना गौरविण्यात आले.

राजभवनातील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम झाला. गोवा घटक राज्य दिनाचे औचित्य साधून कला आणि संस्कृती संचलनालय आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Gomant Vibhushan Award 2023
Goa Statehood Day: काय आहे गोवा घटकराज्य दिन? 7 पॉईंट्समध्ये जाणून घ्या, या दिवसाचे महत्व...

लोककला क्षेत्रातील सेवेबद्दल विनायक विष्णू खेडेकर यांना सन 2019-20 सालच्या गोमंत विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2021-22 या वर्षाचा गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोएल, कला आणि संस्कृती सचिव मेनिनो डिसुजा, माहिती आणि प्रसिद्धी सचिव सुभाष चंद्रा, डीआयपी संचालक दीपक बांदेकर, कला आणि संस्कृती संचालक सगुन वेळीप आदी यावेळी उपस्थित होते.

गोवा राज्य सरकारतर्फे दर दोन वर्षांनी गोमंत विभुषण पुरस्कार देण्यात येतो. कोरोना महारोगराईमुळे एक वर्ष या पुसस्काराचे वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे सन 2019-20 आणि 2021-22 अशा दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

Gomant Vibhushan Award 2023
Colvale Jail: गँग्स ऑफ 'कोलवाळ'! कारागृहात दोन गटात राडा; अतिरिक्त पोलीस फोर्स तुरुंगात दाखल

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली होती. समितीकडे आलेल्या अर्जातून या निवडी करण्यात आल्या होत्या.

या पुर्वी शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया, लॅम्बार्ट मस्कारन्हेस, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, लक्ष्मण पै आणि डॉ. प्रेमानंद रामाणे या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com