ST Reservation: एसटी आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावू!

ST Reservation: अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना आश्‍वासन
Amit Shah
Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

ST Reservation: नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चव्हाट्यावर आलेल्या आदिवासींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लावण्याचे आश्‍वासन रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले.

सावंत यांनी शहा यांना भेटून केलेल्या चर्चेवेळी एसटी आरक्षणाचा विषय मांडला. दिल्ली दौऱ्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. गेले तीन दिवस मुख्यमंत्री सावंत,

मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. अधिवेशनाच्या अगोदर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिगण आणि आदिवासी समाजातील नेत्यांबरोबर

Amit Shah
Goa Accident Death: गोव्यात तीन दिवसांत 5 मृत्युमुखी, दीड महिन्यात 35 अपघात बळी

केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेऊन आरक्षणाचा विषय पुढे रेटला; परंतु आदिवासी आरक्षणाविषयी शहा यांची भेट होणे महत्त्वाचे होते.

त्यानुसार अधिवेशनात भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांशी वार्तालाप झाल्यानंतर तत्काळ अमित शहा यांची मुख्यमंत्री सावंत यांनी भेट घेतली.

Amit Shah
Goa Accident Case: नोकरीवरून घरी परतताना भरधाव कारची धडक

गडकरींशीही चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी रात्री उशिरा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गोव्यातील विविध प्रकल्पांबाबत त्यांनी चर्चा केली. त्यामध्ये मडगाव येथील वेस्टर्न बायपास, जी-20 संबंधित कामे, कुठ्ठाळी - वेर्णा चारपदरी मार्ग, करमल घाट आणि खांडेपार येथील कामांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crop Loss Compensation
Amit Shah, BL Santosh Goa visit
Goa Tribal Political Reservation
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com