Goa Accident Case: नोकरीवरून घरी परतताना भरधाव कारची धडक

Goa Accident Case: विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र; हरमलप्रकरणी दाेघांना अटक
Goa Accident Case
Goa Accident CaseDainik Gomantak

Goa Accident Case: पोरस्कडे येथे माऊली मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग-66वर आज (रविवारी) दुपारी 12.45 वाजता कारने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात अजीत वसंत च्यारी (वय 57वर्षे) यांचा मृत्यू झाला.

अजीत च्यारी हे वास्को येथे एमपीटीमध्ये नोकरी करतात. रविवारी ते जीए-०३-एफ-५८१५ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पोरस्कडे येथे घरी जात असता, सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच-४७- डब्ल्यू-९७२६) इको व्हॅनने त्यांच्या आता पुरे झाले!

गोव्यातील रस्त्यांवर ४८ तासांत पाचजणांचा जीव गेला, तरी असंवेदनशील भाजप, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून एकही शब्द उच्चारला गेलेला नाही. सर्वजण नरेंद्र मोदी यांचा उदो उदो करण्यात व्यस्त आहेत.

Goa Accident Case
Goa Accident Death: दीड महिन्यात 35 अपघात बळी

आघात झालेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे. जनतेचे दुःख, वेदना यांची अजिबात कदर नसलेल्या भाजपच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि असंवेदनशील वृत्तीची गोमंतकीयांनी गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे.

भाजपने गोमंतकीयांना गृहीत धरले असून सरकारही अहंकाराच्या ओव्हरडोसखाली काम करत आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.

अपघातसत्र बंद व्हायला अजून किती जीव लागतील?

घातक रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास भाजप सरकारला वेळ मिळेपर्यंत आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त होतील, असा सवाल पाटकर यांनी केला आहे.

मी सावर्डेतील दोन मित्रांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होतो. हरमल येथे अपघातात बळी गेलेल्या दोन भावांच्या घरी रविवारी भेट दिली. तिथले हृदयद्रावक वातावरण काळीज पिळवटून टाकणारे होते. गोव्याला भाजपच्या शापातून मुक्त करण्याची वेळ आली आहे, असेही पाटकर यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com