Leopard In Goa: बिबट्याला पकडण्यासाठी मुळगावात शर्तीचे प्रयत्न....

शिरगाव परिसरात दहशत : वन खात्याने घेतली दखल, बिबट्याच्या संचारावर लक्ष
Leopard In Goa
Leopard In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Leopard In Goa: मुळगावातील बिबट्याच्या दहशतीची आता वन खात्याने दखल घेतली असून, त्याला पकडण्यासाठी या खात्याने अखेर सापळा (पिंजरा) लावला आहे. गावकरवाडा येथील गौरेश परब यांच्या घराच्या मागच्या बाजूने हा सापळा लावण्यात आला आहे.

Leopard In Goa
Banastarim Bridge Accident: मर्सिडीजमधील 'त्या' महिलेला पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न: प्रतिमा कुतिन्हो

या परिसरात बिबट्याचा वाढलेला संचार लक्षात घेता, बिबट्या सापळ्यात अडकणार. असा विश्वास वन खात्यासह स्थानिकांना आहे. दोन दिवसांपूर्वी श्री. परब यांच्याच पाळीव कुत्र्याला या बिबट्याने फस्त केले होते.

बिबटा कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून पळतानाचे दृश्य सीसी टीव्ही कॅमेऱ्यातही चित्रित झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) रात्रीही बिबटा गौरेश परब यांच्या घरापर्यंत आला होता. हे दृश्‍यही सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Leopard In Goa
Goa Mining: भूमिजा पोर्टल, जीपीएस यंत्रणेसह नवी कार्यप्रणाली जारी, खनिज वाहतुकीच्या नियमावलीत झाले 'हे' बदल

मुळगाव प्रमाणेच जवळपासच्या शिरगाव गावातही एका बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवली आहे. शिरगाव पंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारत परिसरात लोकवस्तीत या बिबट्याचा संचार असल्याची माहिती मिळाली आहे.

बिबट्याच्या संचारामुळे स्थानिक जनतेमध्ये भीती पसरली आहे. आतापर्यंत या बिबट्याने सहा पाळीव कुत्र्यांना फस्त केले आहे.

रात्री सोडाच, दिवसाही हा बिबटा लोकवस्तीजवळ संचार करीत असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती हर्षदा केरकर या महिलेने दिली.

बिबटा अडकला नाही म्हणून...

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या आठवड्यात शिरगावात ''सापळा'' लावण्यात आला होता. मात्र काल रात्रीपर्यंत बिबट्या काही सापळ्यात अडकला नाही. अखेर आज (मंगळवारी) पंचायतीच्या जुन्या कार्यालयाजवळ लावण्यात आलेला सापळा हटवून तो आता मुळगावात लावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com