Goa Mining: भूमिजा पोर्टल, जीपीएस यंत्रणेसह नवी कार्यप्रणाली जारी, खनिज वाहतुकीच्या नियमावलीत झाले 'हे' बदल

राज्यातील खनिजांच्या वाहतुकीसाठी खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाने नवी कार्यप्रणाली (SOP) जारी केली
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak

Goa Mining: राज्यातील खनिजांच्या वाहतुकीसाठी खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाने नवी कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली. राज्याबाहेरून वाहतूक केली जाणारी खनिज वाहतुकीचा यात समावेश आहे.

Goa Mining
Banastarim Bridge Accident: मर्सिडीजमधील 'त्या' महिलेला पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न: प्रतिमा कुतिन्हो

या नव्या काही प्रणालीनुसार वाहतुकीत गुंतलेल्या सर्व वाहनांची नोंदणी भूमिजा पोर्टलवर करणे विभागाने बंधनकारक केले आहे. सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. ते भूमिजाशी जोडलेले असले पाहिजे.

प्रत्येक वाहनासाठी ट्रिप शीट तयार करणे बंधनकारक करण्यात आले असून प्रत्येक वाहनाने तयार केलेल्या ट्रिप शीटची प्रत बाळगणे बंधनकारक आहे.

Goa Mining
Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरण; महिलेला अटक करा, म्हार्दोळ पोलीस स्टेशनला जमावाचा घेराव

ट्रिप शीटशिवाय खनिज वाहतूक करणारे कोणतेही वाहन बेकायदेशीर मानले जाईल, असे या नव्या एसओपीत नमूद केले आहे. खनिज वाहतूक करताना वाहने ताडपत्रीने झाकणे आवश्यक आहे.

वाहतुकीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (जीएसपीसीबी) मार्गाची मान्यता घ्यावी लागणार आहे. जर स्त्रोत तोलसेतू आणि गंतव्य तोलसेतू यांच्यातील खनिजांच्या वजनात काही तफावत असेल, तर या दोन्हीपैकी जास्त म्हणजे वास्तविक वाहतूक केलेले खनिज मानले जाईल,असेही एसओपीमध्ये स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com