LEGO Goa Robotics Team: गोव्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या 'लेगो गोवा' संघाची आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी निवड

सिंगापुरमध्ये ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा; मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
CM Congratulates LEGO Goa Robotics Team
CM Congratulates LEGO Goa Robotics TeamDainik Gomantak
Published on
Updated on

LEGO Goa Robotics Team: गोव्यातील लेगो गोवा या रोबोटिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या संघाची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संघाचे अभिनंदन केले आहे.

CM Congratulates LEGO Goa Robotics Team
Mumbai-Margao Vande Bharat: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला जोडणार आणखी 8 डबे

आता ते फर्स्ट ग्लोबल चॅलेंज या इंटरनॅशनल ऑलिंपिक स्टाईल रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा सिंगापूर येथे 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात होणार आहे. अपुर्वा काटकर, अथर्व साखळकर, साईप्रणव गांधी, विराज मराठे, वेंकटेश धेंपो यांचा या संघामध्ये समावेश आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

लेगो गोवा हा गोव्यातील काही शाळकरी विद्यार्थ्यांचा संघ आहे. ही कम्युनिटी रोबोटिक्स टीम आहे. ही टीम रोबोटिक्समध्ये काही ना काही काम करत असते. त्यांनी लेगो ब्लॉक्सचा वापर करून रोबोटिक किट्सपासून सुरुवात केली. त्यांनी स्वतःचे रोबोट डिझाइन करण्यास सुरुवात केली आहे.

CM Congratulates LEGO Goa Robotics Team
Goa Crime News: विनयभंगाची तक्रार असलेला फरार आफ्रिकन आरोपी अखेर हणजूणे पोलिसांच्या ताब्यात

रोबोट्स बनविण्याच्या विविध स्पर्धांमध्ये हा संघ सहभागी होतो. रोबोटच्या विविध भागांचे प्रोटोटाईप (नमुने) तयार करण्यात हा संघ मदत करतो. विविध स्पर्धांमध्ये या टीमने ठरवून दिलेले विशिष्ट टास्क पूर्ण केल्या आहेत.

यापुर्वी हा संघ फर्स्ट टेक चॅलेंज (FTC) या सर्वात प्रतिष्ठित रोबोटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. टीम लेगोगोवा 14 सदस्यांची बनलेली आहे आणि या स्पर्धेत सहभागी होणारा राज्यातील पहिला संघ आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र होण्यासाठी गोवा सरकारने 2 लाख रुपये प्रायोजकत्व म्हणून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com