Goa Crime News: विनयभंगाची तक्रार असलेला फरार आफ्रिकन आरोपी अखेर हणजूणे पोलिसांच्या ताब्यात

एका महिलेचा विनयभंग केला असल्याचा गुन्हा त्याच्यावर करण्यात आला होता
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ठाणेमधील एका महिलेच्या तक्रारीवरून एका दक्षिण आफ्रिकन परदेशी आरोपी व्हिक्टर व्हॅन निकर्क याच्याविरुद्ध कलम 448, 323, 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो फरार झाला होता.

Goa Crime News
Goa Agriculture : काणकाेण तालुक्यातील खरीप शेतीच्या कामांना यंदा विलंब

त्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले मात्र तो काही केल्या पोलिसांच्या ताब्यात आरोपीचा शोध न लागल्याने सदर प्रकरण तात्पुरते बंद करण्यात आले. 2 वर्षापूर्वी तो गोव्यात आला असताना त्याने एका महिलेचा विनयभंग केला असल्याचा गुन्हा त्याच्यावर करण्यात आला होता.

मात्र त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मुंबईमध्ये फिरताना दिसला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पीएसआय तुकाराम पेडणेकर, पीसी- दीपेश चोडणकर, अनिकेत पेडणेकर यांच्यासह हणजूणे पोलिसांचे पोलिस पथक तात्काळ कुलाबा, मुंबई महाराष्ट्र येथे पाठवण्यात आले.

अथक प्रयत्नांनंतर त्याला मुंबईमधून शोधून पकडण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला हणजूणे पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

हा संपूर्ण तपास एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com