CM Pramod Sawant: पौष्टिक तांदळाविषयी पत्रके देणार

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची माहिती : हा तांदूळ हानिकारक असल्याचा फेरेरांचा दावा
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant twitter

CM Pramod Sawant: पौष्टिक तांदूळ कोणी खावा, कोणी खाऊ नये याची पत्रके शिधापत्रिकाधारक दुकानांवर धान्य न्यायला आल्यावर उपलब्ध केली जातील. स्टीकरही वापरात आणले जातील. केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर पौष्टिक तांदूळ उपलब्ध करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल,

असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (ता.९) विधानसभेत नमूद केले. याविषयीचा प्रश्न हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी विचारला होता.

फेरेरा म्हणाले, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्‌स (फोर्टिफिकेशन ऑफ फूड्स) रेग्युलेशन, २०१८ च्या कलम ७ (४) नुसार, थॅलेसेमिया आणि सिकलसेल रोग यांसारख्या हिमोग्लोबिनोपॅथीच्या (रक्त विकारांचा एक गट जो लाल रक्तपेशींवर परिणाम करतो) रुग्णांना लोह खाण्यास मनाई आहे.

CM Pramod Sawant
MLA Vijay Sardesai: आच्छादनाशिवाय कोळसा हाताळणी नाही

जागतिक वैज्ञानिक पुराव्यावर आधारित हे आहे. हा अभ्‍यास सरकारने केला आहे का? यादरम्यान शिधापत्रिकेवर उकडा तांदूळ विकावा, असा विचार व्हिएगस यांनी मांडला त्यावर मुख्यमंत्र्यांनी लोक शिधापत्रिकेवर १० रुपयांना तांदूळ घेतात आणि २० रुपयांना विकतात,

असे नमूद केले. उकडा तांदूळ १० रुपयांना घेऊन ते ७० रुपये किलो दराने विकतील, अशी भीतीही व्यक्त केली. त्यावर व्हिएगस यांनी दारिद्र्य रेषेखाली चुकीच्या लोकांची गणना केल्याने असे लोक तांदूळ घेतात आणि खरोखरच्या गरिबांना विकतात, असा शेरा मारला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com