संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर आज तोडगा काढणार; CM सावंत

या बैठकीत सहभागी होण्यासाठी 7 पैकी 3 सेविका विधानसभा संकुलात पोहोचल्या आहेत.
Anganwadi Worker Protest
Anganwadi Worker ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: विरोधकांनी संपावर असलेल्या 7 अंगणवाडी सेविकांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभापतींना हस्तक्षेप करण्यास सांगितले आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज कार्यकर्त्यांना बैठकीसाठी विधानसभा संकुलात बोलावले.

(Striking Anganwadi workers called for meeting in speakers office)

Anganwadi Worker Protest
वादग्रस्त पोलीस अधिकारी एकोस्कर यांच्या चौकशीत चालढकल सुरूच

विधानसभा संकुलातील सभापती कार्यालयात संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. या बैठकीत सहभागी होण्यासाठी 7 पैकी 3 सेविका विधानसभा संकुलात पोहोचल्या आहेत.

अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत विरोधकांनी सभागृहात उठवला आवाज दरम्यान, आंदोलक सेविकांना विधानसभा संकुलात बोलावून घेऊन आजच चर्चा करून प्रश्न सोडवण्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com