
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३४ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. महायुतीला राज्यातून अनपेक्षित बहुमत मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना विजयासाठी शुभेच्छा दिल्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने मुंबईत फडणवीसांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
दिवगंत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा राजकीय नेते उत्पल पर्रीकरांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीला मिळालेल्या विजयासह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी येत्या ०५ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरु आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता संघर्षानंतर महायुती सरकारचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होण्याबाबत जवळपास शिक्कामोर्तब झाला असून, केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी गोव्यातून नेत्यांची मोठी फौज दाखल झाली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर स्टार प्रचारक पदाची जबाबदारी होती. यासह राज्यातून भाजपच्या बड्या नेत्यांनी राज्यभर प्रचारासाठी दौरे केले. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी फडणवीसांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि सभापती रमेश तवडकर देखील हजर होते.
दरम्यान, आता मनोहरभाईंचे पुत्र उत्पल पर्रीकरांनी भेट घेऊन फडणवीसांना शुभेच्छ दिल्या. भाजपचे ज्येष्ठ दिवगंत नेते मनोहर पर्रीकरांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, देशाचे संरक्षक मंत्री म्हणून सक्षमपणे जबाबदारी संभाळली होती. पण, उत्पल यांना २०२२ गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने तिकिट नाकारले होते. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढलेल्या उत्पल यांना विद्यमान मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.