Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेना; मराठा कार्डचा वापर शक्य

Maharashtra Government: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस असतील की अन्य एखादा ? याविषयी वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेना; मराठा कार्डचा वापर शक्य
Eknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit Pawar
Published on
Updated on

मुंबई, ता. २९ : महाराष्ट्राचा नवा कारभारी ठरवण्यासाठी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता महायुतीच्या इतर सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. त्यामुळे अमित शहांसोबतच्या बैठकीत असे काय घडले की शिंदेंच्या चेहऱ्यांवरील हास्य उडून गेले? अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी मराठा चेहरा पुढे करण्यात येईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या. त्यामुळे साहजिकच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होते; पण हा नेता देवेंद्र फडणवीस असतील की अन्य एखादा ? याविषयी वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेना; मराठा कार्डचा वापर शक्य
Goa Cabinet Reshuffle: माजी मुख्यमंत्री, विद्यमान सभापती होणार मंत्री; आलेक्स सिक्वेरा, नीलकंठ हळर्णकरांना डच्चू?

या मुद्यावर विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. या नेत्यांची गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत बैठक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com