Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

Pramod Sawant Meet Devendra Fadanvis: विधानसभेतील विजयाने राज्यातील जनतेने भाजप आणि महायुतीच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवल्याचे सिद्ध होते, असे सावंत म्हणाले.
Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
Goa CM Pramod Sawant Meet Maharashtra DyCM Devendra FadanvisDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant Meet Maharashtra DyCM Devendra Fadanvis

मुंबई: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३४ जागांवर विजय मिळाला. राज्यातील जनेतेने पुन्हा महायुतीवर विश्वास ठेवल्याचे मताधिक्यातून दिसून आले, असे सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत यावेळी गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. विधानसभेतील विजयाने राज्यातील जनतेने भाजप आणि महायुतीच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवल्याचे सिद्ध होते, असे सावंत म्हणाले.

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

महाराष्ट्राला विकास आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी त्यांना माझ्या शुभेच्छाही दिल्या, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३४ जागा मिळाल्या आहेत. यात भाजप - १३२, शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ५० जागांवर समाधान मानावे लागले.

स्टार प्रचारक प्रमोद सावंत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी होती. मुख्यमंत्री सावंत यांनी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात २२ सभा घेतल्या त्यापैकी २१ उमेदवार निवडून आले आहेत. सावंत यांचा जवळपास ९५ चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com