धक्कादायक! 'दयानंद' योजनेचे लाभार्थी परदेशात; 4 हजार नावे हयात नसल्याची माहिती उघड

Dayanand samajik suraksha yojana fraud: ज्येष्ठ नागरिकांना मासिक दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या दयानंद समाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी चक्क विदेशात आणि शेजारील राज्यात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Dayanand samajik suraksha yojana fraud
Dayanand samajik suraksha yojana fraudCash
Published on
Updated on

Dayanand samajik suraksha yojana news

पणजी: ज्येष्ठ नागरिकांना मासिक दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या दयानंद समाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी चक्क विदेशात आणि शेजारील राज्यात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या समाज कल्याण खात्याने लाभार्थ्यांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.

समाजकल्याण संचालक अजित पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना लाभ त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जातो. अनेकजण तीन चार महिने बॅंकेतून पैसेच काढत नाहीत. काही लाभार्थी पैसेच स्वीकारत नसल्याने त्याबाबतची माहिती बॅंकेकडून खात्याला देण्यात येत होती.

यामुळे लाभार्थी कोण, ते कुठे राहतात, बॅंकेतून त्यांना पैसे मिळवण्यात कोणत्या अडचणी आहेत, त्यांनी बॅंक खाते बदलले आहे का याची माहिती घेण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Dayanand samajik suraksha yojana fraud
Goa Crime: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पीटीच्या शिक्षकाकडून मारहाण; म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद

या साऱ्याची सुरवात खात्याने ८० वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणाने करण्यात आली. खात्याकडील नोंदीनुसार या वयोगटात २६ हजार लाभार्थी आहेत. प्रत्यक्ष प्रत्येक लाभार्थ्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन केलेल्या सर्वेक्षणात ४ हजार लाभार्थी हयातच नसल्याची धक्कादायक माहिती खात्याला मिळत होती.

त्यांच्या खात्यात मासिक दोन हजार रुपये जमा केले जात होते. काही मयत लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम एटीएममधून काढूनही घेण्यात येत होती असेही सर्वेक्षणादरम्यान आढळून आले आहे. ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यासाठी खाते पावले टाकणार असल्याची माहिती आहे.

Dayanand samajik suraksha yojana fraud
Goa Mining: ..अखेर डिचोलीत ट्रक धावले! खनिजवाहतूक बेकायदेशीर,अवमान करणारी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

पुनर्परीक्षण, कारवाईची गरज

या प्रकरणामुळे राज्य सरकारला या योजनेची पुनर्परीक्षण करण्याची गरज भासू लागली आहे.

या प्रकारच्या गैरप्रकारांवरती आळा बसवण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या प्रकरणात दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com