विश्‍‍वासघातकी अधिकाऱ्यांना घरी पाठवा! 'गोवा वाचवण्यासाठी' नागरिक रस्त्यावर; आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

Goa News: पाटो-पणजी येथील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर राज्यभरातून आलेल्या जनसमुदायाने आंदोलन करत नगरनियोजक राजेश नाईक यांना हटविण्याची एकमुखी मागणी केली
Goa News: पाटो-पणजी येथील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर राज्यभरातून आलेल्या जनसमुदायाने आंदोलन करत नगरनियोजक राजेश नाईक यांना हटविण्याची एकमुखी मागणी केली
Goa Bachao Abhiyan At Panjim Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bachao Abhiyan Protest At Panjim To Protect Lands

पणजी: प्रादेशिक आराखडा २०११ विरोधात २००६ मध्ये ‘गोवा बचाव’ अभियानाकडून आंदोलन झाले होते, त्याच धर्तीवर पुन्हा आता राज्‍यातील जमिनींच्या संरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. पणजीत आज त्‍यांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

सरकार व मुख्य नगरनियोजकांनी कायद्यात दुरुस्ती करून जमिनींचे क्षेत्रबदल केले आहेत. या दुरुस्तीच्या अधिसूचना जारी केलेले मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांना पदावरून हटविणे गरजेचे आहे. जनतेने एकत्रित लढा उभारून तो धसास लावण्याची वेळ आली आहे. लोक रस्त्यावर उतरतील तेव्हाच या अधिकाऱ्यांना जाग येईल, असे गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी यावेळी सांगितले.

पाटो-पणजी (Panjim) येथील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर राज्यभरातून आलेल्या जनसमुदायाने आंदोलन करत नगरनियोजक राजेश नाईक यांना हटविण्याची एकमुखी मागणी केली. यावेळी खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी आमदार एलिना साल्ढाणा, प्रजल साखरदांडे, प्रतिमा कुतिन्हो, तारा केरकर यांच्यासह

विविध गावांतून आलेल्या लोकांचा समावेश होता. पणजीत करण्यात आलेल्या आंदोलनावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, राज्याच्या मुख्य सचिवानीही भूरुपांतरण करून जमीन खरेदी केली आहे. गोव्याची संस्कृती संपविण्याचा प्रकार आहे. पेडण्यातील ३ लाख १७ हजार चौ. मी. जमीन एका कॅसिनोच्‍या घशात घालण्‍यात आली आहे.

मोपा विमानतळासाठी गरीब शेतकऱ्यांची जमीन ९ रुपये प्रतिचौरस मीटर या दराने सरकारने घेतली आहे, असेही ते म्‍हणाले. यावेळी पी. डिसोझा, राजन घाटे, समील वळवईकर, राजदीप नाईक, गोविंद शिरोडकर यांच्‍यासह अनेकांनी विचार मांडले.

सांकवाळवासीयांची मोठी उपस्थिती

सांकवाळमध्ये येऊ घातलेल्या ‘भुतानी इन्फ्रा’ (Bhutani Infra Project Sancoale) विरोधात तेथील नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळेच सर्वत्र लोकांमध्ये जागृती झाली आणि विविध गावांतील लोक प्रकल्पांविरोधात रस्त्यावर येऊ लागले. मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांना हटविण्याची मागणी करण्यासाठी झालेल्या या आंदोलनात सांकवाळमधून मोठ्या प्रमाणात लोक पणजीत आले होते. त्यांनी आणलेले फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

विश्‍‍वासघातकी अधिकाऱ्यांना घरी पाठवा; क्‍लॉड

सुमारे २२ लाख चौ. मी. जमीन १६ (ब) खाली क्षेत्रबदल करण्यात आली होती. मात्र हे कलमच रद्द केल्याने ती सुरक्षित राहिली. आणखी सुमारे २२ लाख चौ. मी. जमीन कलम १७ (२) खाली क्षेत्रबदल केली आहे. आता ती रद्द करण्यासाठी लढा कायम ठेवण्याची गरज आहे. कलम ३९ (अ) खाली क्षेत्रबदल केलेली जमीनही पूर्वस्थितीत आणण्याची गरज आहे. ज्या अधिकाऱ्यांनी विश्‍वासघात केला त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असे डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी सांगितले.

Goa News: पाटो-पणजी येथील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर राज्यभरातून आलेल्या जनसमुदायाने आंदोलन करत नगरनियोजक राजेश नाईक यांना हटविण्याची एकमुखी मागणी केली
गोमंतकीयांची 'गोवा बचाव'ची हाक! भू-रूपांतरणे, रिअल इस्टेट माफियांच्या कारवायांना कंटाळून नागरिकांची एकजूट

ठळक वैशिष्‍ट्ये

राज्यात कोणत्याही परवानग्या नसताना मेगा प्रकल्प येतात,ते कोणाच्या आशीर्वादाने?

सांकवाळमध्ये प्रकल्प आणून मंत्री माविन गुदिन्हो यांनी येथील नागरिकांची झोप उडविली आहे.

मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांना तातडीने हटवावे.

कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून पोलिसांचा पहारा. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी.

दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्‍या या आंदोलनात हळूहळू आंदोलकांची संख्‍या वाढत गेली.

आंदोलनकर्त्यांच्या हातातीत फलक वेधून घेत होते लक्ष.

८८३ आंदोलनकर्त्यांनी निवेदनावर केल्या सह्या.

उप मुख्य नगरनियोजक वर्तिका डागर यांच्याकडे क्लॉड आल्वारीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन.

सरकारने गोव्याची विक्री बंद करावी. विविध प्रकल्पांमुळे राज्यातील नैसर्गिक आच्छादन पूर्णपणे नष्ट होणार आहे. दिल्लीच्या बिल्डरांना गोव्यात थारा देऊ नका. सर्वांनी एकत्र येऊन गोवा सांभाळायला हवा.

प्रजल साखरदांडे, सामाजिक कार्यकर्ते

टीसीपी खाते ‘टोटल करप्शन प्लॅनिंग'' बनले आहे. भ्रष्टाचार कसा करायचा, याचा आराखडा तेथे तयार होतो. मेगा प्रकल्पांमुळे पाणी-वीज समस्या निर्माण होणार आहे. खाण व्यवसाय संपला आहे, तसाच पर्यटन व्यवसायही संपेल.

वेनान्सियो सिमॉईस, गोवा एकवोट

सहा वर्षांपूर्वी २०१८ मध्ये आम्ही राजेश नाईक यांनी खुर्ची सोडण्याची मागणी केली होती. भाजप सरकारने गोवा विकयलाा काढला आहे. राज्यातील भूरुपांतरणाचा विषय लोकसभेत उपस्‍थित करणार आहे.

कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com