Goa Congress: मटकाविरोधी कारवाईची सरकारला आताच का जाग? काँग्रेस सरचिटणीसांचा सरकारवर हल्लाबोल

Vijay Bhike on Goa matka policy: सरकार हप्ते गोळा करण्याचे काम करत आहे. अशाप्रकारचा कारभार सुरू राहिल्यास सामान्य जनतेला वाली कोण? असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केला आहे.
Vijay Bhike on Goa matka policy
Vijay Bhike on Goa matka policyDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: सरकारला मटकाविरोधी कारवाईला आताच का जाग आली? गोव्यात मटका व्यवसाय अनेक वर्षांपासून खुलेआम चालत होता, तेव्हा पोलिसांनी कारवाई का केली नाही? कॅसिनोमध्येही मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार चालतात, जो एक प्रकारचा जुगारच आहे.

तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे, मग मटका व्यवसायातून सरकारला काही मिळत नाही का? गोव्यात गुन्हेगारी वाढत आहे, पोलिसांवर हल्ले होत आहेत, पण सरकार केवळ पाहत आहे. सरकार हप्ते गोळा करण्याचे काम करत आहे. अशाप्रकारचा कारभार सुरू राहिल्यास सामान्य जनतेला वाली कोण? असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केला आहे.

Vijay Bhike on Goa matka policy
Goa Congress: राहुल गांधींमुळेच जातनिहाय जनगणनेचा निर्णय! गोवा काँग्रेस नेत्यांचा दावा; भाजप कार्यालयापुढे आनंदोत्सव

म्हापशातील काँग्रेस कार्यालयात उत्तर गोवा काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, चंदन मांद्रेकर उपस्थित होते.

Vijay Bhike on Goa matka policy
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

विजय भिके यांनी गोवा पोलिसांच्या अलीकडील मटकाविरोधी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्राईम ब्रँचने स्थानिक १३ मटका एजंटांसह कल्याण मटका किंग स्व. सुरेश भगत यांच्या पत्नी जया चढ्ढा (मुंबई), चंदूभाई ठक्कर ऊर्फ डिसा आणि घनश्यामभाई (गुजरात) या प्रमुख एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोव्यातील १२ बुकींना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com