Assembly Session Live Updates : म्हादईसाठी विरोधकांची 'गोवा बंद'ची हाक; आमदार वीरेश बोरकर यांचे वक्तव्य
'म्हादई वाचवा' सभेला उपस्थित राहणार नाही : वीरेश बोरकर
म्हादई वाचवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणजे आज साखळीमध्ये रॅली निघणार आहे. साखळीतील आजच्या 'म्हादई वाचवा' सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय मी आणि माझ्या पक्षाने घेतला आहे, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.
म्हादईसाठी विरोधकांची 'गोवा बंद'ची हाक; आमदार वीरेश बोरकर यांचे वक्तव्य
विधानसभेतून बाहेर आल्यावर आमदार वीरेश बोरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. म्हादईबाबत RGने चळवळ सुरू केली असून अशा अनेक प्रकल्पांबाबत आम्ही जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हादई वाचवण्यासाठी मी सर्व विरोधक, जनता, NGOना 'गोवा बंद'ची हाक देतो. यावरून आपण सरकारला घेरून याचे महत्व पटवून देऊ शकतो.
म्हादईबाबत राज्यपालांचे हे कृत्य अमानवी आणि असंवेदनशील : RG प्रमुख मनोज परब
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषण केल्यानंतर RG पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी ट्विट केले, “गोव्याच्या राज्यपालांनी त्यांच्या विधानसभेच्या भाषणात म्हादईचा उल्लेख केलेला नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. राज्यपालांचे हे अमानवी आणि असंवेदनशील कृत्य आहे. गोव्याची जीवनरेखा म्हादई नदी कर्नाटकात वळवण्यात आली आहे आणि राज्यपाल त्याबद्दल बोलण्याची तसदीही घेत नाहीत.
आम्ही एकत्रच आहोत : वीरेश बोरकर
मी विरोधकांसोबतच आहे; म्हणूनच मी पण आज काळे कपडे घालून आलो. फक्त संवाद नीट न झाल्याने मी इतर आमदारांसोबत विधानसभेतून बाहेर पडू शकलो नाही. मात्र आम्ही एकत्रच आहोत.
'म्हादई'ला कसे वाचवायचे हे विरोधकांनी सांगायची गरज नाही : डॉ. दिव्या राणे
म्हादईवरुन विरोधक राजकारण करत आहेत ही अतिशय वाईट गोष्ट आहे. 'म्हादई'ला कसे वाचवायचे हे विरोधकांनी सांगायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे की यांच्या लोकांना कसे सांभाळायचे. म्हादई गेल्याचा सगळ्यात जास्त फटका यांच्या सत्तरी मतदारसंघालाच होणार आहे. विरोधक फक्त आंदोलन आणि घोषणाबाजी करून 'म्हादई'वरुन राजकारण करत आहेत.
आता भाजप सरकार विरुद्ध जनता : व्हेंझी व्हिएगास
आता भाजप सरकार विरुद्ध जनता अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री आज जाहीर सभेला विरोधकांची उपस्थिती दडपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याऐवजी, ओपिनियन पोलच्या 56 व्या वर्धापनदिनानिमित्त डबल-इंजिन सरकारने आपल्या वक्तृत्वाचा पाठपुरावा करावा आणि डीपीआर मंजूरी मागे घ्यावी : व्हेंझी व्हिएगास
सरकार सालाझारप्रमाणे हुकूमशाही करत आहे : युरी
मी गोवा सरकारला एकच सांगतो की, ही दादागिरी, ही हुकूमशाही चालणार नाही. मुख्यमंत्री सांगतात की ते केंद्रीय मंत्र्यांची गोव्याच्या विषयावरून चर्चा आणि सल्लामसलत करत आहेत पण हा निव्वळ खोटेपणा असून त्यांना गोव्याच्या कुठल्याच विषयाबद्दल काहीही पडलेले नाही. गोवा सरकारची ही हुकूमशाही सालाझारसारखीच आहे. विरोधकांची बोलती बंद करून नेमकं गोवा सरकारला काय दाखवून द्यायचं आहे ते माहित नाही.
गोवा सरकार विरोधकांना का घाबरते? : युरी आलेमाव
विधानसभेत मार्शल कडून विरोधकांना बाहेर काढल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमावू यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले हे सरकार विरोधकांना का घाबरते. एकतर अधिवेशनाचा कालावधी कमी करूनही आम्ही मांडत असताना मुद्द्यांवर त्यांनी विरोधकांचा माईक बंद करून आम्हाला आमचे मत मांडू दिले नाही. हा तर लोकशाहीचा खून आहे. काल मुख्यमंत्र्यांनी तीन M बद्दल सांगितले... एक म्हणजे म्हादई, दुसरे मायनिंग आणि तिसरे मोपा
'आमची म्हादई, आम्हाला पाहिजे' विषयावरून विरोधकांची घोषणाबाजी
विधानसभेत विरोधकांचा गदारोळ
आजपासून गोवा विधानसभा अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केल्याचे समोर आले आहे. गोवा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच राज्यपालांच्या अभिभाषनावेळी म्हादईविषयावरून विरोधी आमदारांचा घोषणाबाजी करत गदारोळ केला. सर्व विरोधी आमदारांनी 'आमची म्हादई, आम्हाला पाहिजे' असे फलक फडकवत सभापतीच्या समोरील हौदात येत जोरदार घोषणा बाजी केली. आज पहिल्यांदा आमदारांनी काळी कपडे घालून सरकारचा केला निषेध केला. विरोधकांचा गदारोळ थांबत नसल्याचे लक्षात येताच सभापतींनी या आमदारांना मार्शल कडून सभागृहाबाहेर बाहेर काढले.
गोवा अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे
गोवा आठव्या विधानसभेच्या तिसऱ्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

