Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Kunal Thakur Disability Achievements: पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून ॲड. कुणाल किरण ठाकूर यांनी पदभार स्वीकारला.
Kunal Thakur Disability Achievements
Kunal Thakur Success StoryDainik Gomantak
Published on
Updated on

प्रकाश तळवणेकर

पेडणे: पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून ॲड. कुणाल किरण ठाकूर यांनी पदभार स्वीकारला. जन्मजात दिव्यांगत्वावर मात करत त्यांनी शिक्षण-सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

कुणाल यांनी २०१६ मध्ये एसएससी परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवून दिव्यांग प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. २०१८ मध्ये उच्च माध्यमिक परीक्षा ७४ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पणजी येथील साळगावकर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. सध्या ते एलएलएमचे शिक्षण घेत आहेत.

Kunal Thakur Disability Achievements
Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले आहे. २०२२ पासून सीएसआर निधीतून गरजू दिव्यांगांना १५ हून अधिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर मिळवून देण्यात त्यांचा सहभाग आहे. दिव्यांगांसाठी बससेवा सुलभ करण्याबरोबरच त्यांच्या वैद्यकीय प्रमाणन प्रक्रियेसाठीही त्यांनी प्रयत्न केले. कुणाल यांनी विविध सामाजिक प्रश्नांवरही सक्रिय सहभाग घेतला आहे.

गरजू दिव्यांगांना मिळवून दिल्‍या व्हीलचेअर

२०२२ पासून सीएसआर निधीतून १५ हून अधिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर गरजू दिव्यांगांना मिळवून देण्यात कुणाल ठाकूर यांनी योगदान दिले. कोविड काळात दिव्यांगांसाठीच्या लसीकरण मोहिमेत स्वतः प्रथम लस घेतली. दिव्यांग मुलांसाठी किकबॉक्सिंग वर्ग, विशेष मुलांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळवून देणे, तसेच ‘हाय सपोर्ट नीड स्कीम’अंतर्गत वैद्यकीय प्रमाणन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

Kunal Thakur Disability Achievements
Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

शैक्षणिक कामगिरी

२०१६ : एसएससीमध्ये ८६ टक्के गुण; दिव्यांग प्रवर्गात राज्यात प्रथम.

२०१८ : उच्च माध्यमिक परीक्षेत ७४ टक्के गुण.

पणजीतील साळगावकर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण.

सध्या एलएलएमचे शिक्षण सुरू.

गोवा सरकारच्या काजू महोत्सव २०२६ उपक्रमाचे प्रवर्तक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com