Drugs Case
Drugs CaseDainik Gomantak

Anjuna Beach: युगांडाच्या दोन महिला ड्रग्ज विक्रीसाठी हणजुण बीचवर आल्या अन्...

ग्राहकांना ड्रग्ज पुरवण्यासाठी आलेल्या दोन युगांडाच्या महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
Published on

हणजुणे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या छाप्यात दोन परदेशी महिलांना अंमली पदार्थांचा साठा ठेवल्याबद्दल अटक केली आहे. म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून हणजुणेच्या किनारपट्टी भागात विदेशी महिला अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे हणजुणे पोलिसांचे पथक अलर्ट झाले होते.

आज सकाळी 08.30 च्या सुमारास हणजुणे येथे पोलीस पथकाने सध्या वेशात या भागात पाळत ठेवली होती. दरम्यान त्याठिकाणी ग्राहकांना ड्रग्ज पुरवण्यासाठी आलेल्या दोन युगांडाच्या महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली.

झडती घेतेवेळी त्यांच्याकडून 07 ग्रॅम सायकोट्रॉपिक ड्रग्स (साधारणतः किंमत रु. 45,000/-,) 10.3 ग्रॅम सायकोट्रॉपिक औषधे, कोकेन (साधारणतः किंमत. 82,400/-), आणि 3.4 ग्रॅम सायकोट्रॉपिक ड्रग्स MDMA किंमत 34,000/- असा एकूण 1,61,400/-चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.

Drugs Case
Som Yag Yadnya 2023: समाज, राज्य, राष्ट्र यांच्या उन्नतीसाठीच सोमयाग यज्ञ उत्सव- श्रीपाद नाईक

या दोन्ही आरोपींना NDPS कायद्याच्या कलम 22(b), 21(b) अंतर्गत अटक करण्यात आली असून त्या सध्या पोलीस कोठडीत आहेत. छापा टाकणाऱ्या पथकामध्ये एसपी उत्तर निधिन वलसन, आयपीएस, एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी केले होते आणि त्यात पीआय प्रशाल एन. देसाई, एलपीएसआय स्नेहा सावळ, कॉन्स्टेबल लीना गोवेकर, वीणा सावंत, प्रवीण पाटील आणि शांबा शेटगावकर यांचा समावेश होता.

पुढील तपास पीआय प्रशाल देसाई करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com