34th All India Konkani Convention: कोकणी भाषेचा देशभर प्रसार अभिमानास्पद; CM प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुण्यात 34 व्या अखिल भारतीय कोकणी अधिवेशनाचे उद्घाटन

Konkani Language: कोकणी भाषेचा देशाच्या विविध भागांत प्रसार होणे, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Konkani Language
34th All India Konkani ConventionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: कोकणी भाषेचा देशाच्या विविध भागांत प्रसार होणे, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शनिवारी पुण्यातील यशवंतराव स्मारक समितीच्या सभागृहात ३४ व्या अखिल भारतीय कोकणी अधिवेशनाला सुरुवात होणार असून, या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणी अधिवेशन देशाच्या विविध भागांत आयोजित करणे ही चांगली गोष्ट आहे. कोकणी भाषा जगातील इतर राष्ट्रांमध्येही पोहोचत आहे, हीदेखील आनंदाची बाब आहे. आपण यापूर्वी तीन कोकणी अधिवेशनांना उपस्थिती लावली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Konkani Language
Goa Dairy Employees: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार विरियातो फर्नांडिस यांचा पाठिंबा; सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

यंदाचे अधिवेशन अखिल भारतीय कोकणी परिषद, पुणे येथील औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्यिक अरुणा ढेरे या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, सी. ए. नंदगोपाळ शेणै सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

आज विविध सत्रे

या अधिवेशनांतर्गत शनिवारी ‘कोकणी शिक्षणा मुखारचीं आव्हानां आनी उपाय’ आणि ‘पुण्यांतली कोकणी चळवळ - आव्हानां आनी उपाय’ या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘डिजिटल युगांत कोकणी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. त्यानंतर साहित्यिक सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Konkani Language
Goa Government Spending: गोव्यात 5 वर्षांत इव्हेंट-महोत्सवांवर 675 कोटींचा खर्च; जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा दुर्गादास कामत यांचा आरोप

उद्या युवा संवाद आणि समारोप

रविवारी सकाळच्या सत्रात ‘युवा संवाद - युवा पिळगे खातीर कोकणी’ या विषयावर चर्चासत्र आणि साहित्य सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता समारोप सोहळा होईल. यावेळी साहित्यिक डॉ. जयंती नायक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.