Goa Dairy Employees: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार विरियातो फर्नांडिस यांचा पाठिंबा; सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

Goa Dairy Employees Protest: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली जाईल.
Goa Dairy Employees Protest
Goa Dairy EmployeesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फोंडा: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली जाईल. राज्यस्तरावर हा प्रश्न सुटला नाही, तर राष्ट्रीय पातळीवर नेऊन लोकसभेत आवाज उठवला जाईल, असे आश्वासन खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिले.

गोवा डेअरीच्या प्रवेशद्वाराजवळ कामावरून सुटल्यानंतर कर्मचारी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला खासदार विरियातो फर्नांडिस यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी कामगार प्रतिनिधी हेमंत सावंत, काँग्रेसचे कुशावती जिल्हाध्यक्ष तथा फोंड्याचे नेते राजेश वेरेकर, माजी सरपंच जॉन मास्कारेन्हस आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Dairy Employees Protest
Goa Government Spending: गोव्यात 5 वर्षांत इव्हेंट-महोत्सवांवर 675 कोटींचा खर्च; जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा दुर्गादास कामत यांचा आरोप

गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए), सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तसेच इतर मागण्या मान्य होणे आवश्यक आहे. या मागण्यांसाठी आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून डेअरी प्रशासनाने त्यांची पूर्तता करावी, असे फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी आयटकचे नेते हेमंत सावंत तसेच कामगार प्रतिनिधी सुरेंद्र वेळीप आणि निलेश सतरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रश्‍न लोकसभेत मांडणार!

सरकारकडून मोठे इव्हेंट आयोजित करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही उधळपट्टी थांबवून जनतेचा पैसा जनतेच्याच उपयोगासाठी खर्च झाला पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास प्रश्न सुटेल; अन्यथा तो लोकसभेत मांडण्यात येईल. त्यासाठी डेअरी प्रशासनाला एक आठवड्याची मुदत देऊया, असेही त्यांनी नमूद केले.

Goa Dairy Employees Protest
Goa Politics: मांद्रे मतदारसंघावर मगोचा दावा; 'युती झाली तर जागा आम्हालाच हवी', दीपक ढवळीकरांचे स्पष्ट विधान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.