Konkani Film Festival: काणकोण येथे रंगणार 'कोकणी चित्रपट महोत्सव'! कुठे कराल बुकिंग, काय आहेत तारखा; जाणून घ्या..

Konkani Film Festival Cancona: काणकोण येथे पहिल्यांदाच कोकणीतील दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत असून ह्या संधीचा काणकोणवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र गोसावी यानी केले आहे.
Konkani Film Festival Canacona
Konkani Film Festival CanaconaDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: कला चेतना, वळवई आणि रंग सांगाती, काणकोण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणी चित्रपट महोत्सव ७ ते ११ डिसेंबर या कालावधीत काणकोण येथील रवींद्र भवनात आयोजित केला जाणार असल्याची माहिती कला चेतना वळवईचे राजदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महोत्सवाचे कार्याध्यक्ष उमेश तुबकी, रंग सांगातीचे अध्यक्ष राजेंद्र गोसावी, निर्माती व दिग्दर्शक सुचिता नार्वेकर आदी उपस्थित होते. सर्व चित्रपट हे रात्री ७.३० वा दाखविले जाणार आहेत.

काणकोण येथे पहिल्यांदाच कोकणीतील दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत असून ह्या संधीचा काणकोणवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र गोसावी यानी केले आहे.

Konkani Film Festival Canacona
IFFI Goa 2025: गोमंतकीय कलाकार, सिनेकर्मींचे इफ्फीत स्थान काय? आणखी एक ‘फ्लॉप’ आवृत्ती..

कोकणी चित्रपट सृष्टीचा गौरव करणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे, येथील प्रेक्षकांना उत्तम चित्रपटांचा अनुभव देणे, कोकणी फिल्म गावागावांत पोहोचवणे, संपूर्ण गोव्यात असा सिने महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ७ रोजी ‘होम स्वीट होम’, ८ रोजी ‘होम स्वीट होम पार्ट २’, ९ रोजी ‘केस्तांव दे कोफुसांव’, १० ‘मोर्तू’, अशी चार मोठे चित्रपट तर ११ रोजी शॉर्ट फिल्म दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये चार लघुपटांचा समावेश आहे.

Konkani Film Festival Canacona
Aamir Khan IFFI: ‘गोवा इतनी सुंदर जगह है, की यहां हप्तेभर के लिए आना चाहिए’, आमीरने जागवल्या 'दिल चाहता है'च्या आठवणी

पासची सुविधा; बुकिंग सुरू

पाच दिवसांच्या महोत्सवासाठी पासची सुविधा असेल. सिंगल डे किंवा फाईव्ह डे दोन्ही प्रकारची तिकिटे www.kalachetanavolvoi.com वर ऑनलाईन बुकिंग सुरू केली आहेत. लकी प्रेक्षक व उत्कृष्ट रिव्युसाठी बक्षीस दिले जाईल. अधिक माहितीसाठी सुचिता नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा. उमेश तुबकी यांनी स्वागत आणि आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com