Goa Crime News : गोव्यात धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; महाराष्ट्रातील युवकाला अटक

कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई
Rape on Minor in Goa
Rape on Minor in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway : पेडणे येथे धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोकण रेल्वे पोलिसांनी केली. झालेल्या प्रकाराबद्दल त्या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली.

Rape on Minor in Goa
Rumdamol : रुमडामळ येथे तणावपूर्ण परिस्थिती; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

याबाबत कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून कोचूवेली येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये संशयिताचे कुटुंबीय आणि त्या मुलीचे कुटुंबीय प्रवास करीत होते. आज पहाटे 3 च्या सुमारास संशयित मुलाने त्या मुलीला स्पर्श केला. झालेल्या प्रकाराबाबत मुलीने आईला सांगितले.

दरम्यान, ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर त्या मुलीच्या आईने पोलिसात झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत कोकण रेल्वे पोलिसांनी संशयिताला अटक केली. रोहन शेट्टी (34) रा. ठाणे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa POCSO Case
Jharkhand Mob Lynching Case
Dangerous Social Media Stunt Viral Video
Goa Spa Owner Rape Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com