Konkan Railway: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सातजण जेरबंद; 60 मोबाईल जप्त

Konkan Railway mobile theft racket: रेल्वे प्रवासात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एकूण सातजणांना जेरबंद करून ६० मोबाईल जप्त केले आहे.
Konkan Railway mobile theft racket
Konkan Railway mobile theft racketDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रेल्वे प्रवासात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एकूण सातजणांना जेरबंद करून ६० मोबाईल जप्त केले आहे.

मुकेश कुमार चौहान (महाराष्ट्र), राधेश्याम (उत्तर प्रदेश), राम सजन चौहान (महाराष्ट्र), लालसिंग (उत्तर प्रदेश), सोनू दीक्षित (मडगाव), रियाझ अली झाकीर (फोंडा) आणि प्रविण सेल्वराज (केरळ) अशी संशयितांची नावे आहेत.

कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, उपअधीक्षक हिरू कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी वरील कारवाई केली.

Konkan Railway mobile theft racket
Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला; नागरिकांना तात्पुरता दिलासा, पण पुढील 6 दिवस 'या' भागांत मध्यम सरींचा इशारा

मागच्या अनेक महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवासात प्रवाशांचे मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या विविध गुन्ह्यांचा तपास, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम राबवून पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणांचा अखेर छडा लावला.

Konkan Railway mobile theft racket
Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे, असे आवाहन कोकण रेल्वे पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com