Republic Day Goa Tableau: गोयेंची संस्कृती आनी अस्मितायेचे दर्शन घडोवपी चित्ररथ! दोन वर्षानंतर मिळाली संधी

Republic Day 2025: तुम्हाला माहितीये का नोव्हेंबर २०२४ पासून या चित्ररथाच्या तयारीसाठी ४० जणांचा गट काम करतोय, ज्याचे नेतृत्व सुशांत खेडेकर करत आहेत
 Republic Day parade
Republic Day paradeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने गोव्याचा चित्ररथ दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दिल्लीत दिसणार आहे. गेल्यावर्षी गोव्याचा चित्ररथ दिसणार होता खरा, मात्र काही कारणामुळे तो रद्द झाला आणि आता दिल्लीत इतर राज्यांसह गोवा देखील स्वतःचे वेगळेपण दाखवेल. तुम्हाला माहितीये का नोव्हेंबर २०२४ पासून या चित्ररथाच्या तयारीसाठी ४० जणांचा गट काम करतोय, ज्याचे नेतृत्व सुशांत खेडेकर करत आहेत.

सुशांत खेडेकर आणि पूर्णानंद पैदारकर यांच्या देखरेखीखाली या चित्ररथाचं काम सुरु होतं. यंदाच्यावर्षी सहभागी होणाऱ्या प्रत्येक राज्यासाठी स्वर्णीम भारत विरासत और विकास अशी थीम देण्यात आलीये आणि यालाच अनुसरून गोवा कावी कलाकृती आणि गोव्यातील प्रसिद्ध दीवजांचा उत्सव चित्ररथाच्या माध्यमातून सर्वांसमक्ष आणणार आहे. यामधून गोव्याचा सांस्कृतिक इतिहास आणि ओळख जगासमोर यावी हाच उद्देश आहे.

गोव्यातील प्रसिद्ध कावी कलाकृतीबद्दल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये बोलले होते आणि आता हीच जुनी चित्रकला सर्वांसमोर यावी म्हणून गोव्याच्या पर्यटनासोबत कावी कलाकृती देखील चित्ररथाचा महत्वाचा भाग असेल असं स्वतः खेडेकर म्हणाले आहेत.

पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचा चित्ररथ पर्यटनाच्या घटकाशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच दोन वर्षांनंतर होणाऱ्या या परेडमध्ये गोव्याच्या चित्ररथाची शान वाढवण्यासाठी जलक्रिडेचा पैलू दाखवला जाईल.

 Republic Day parade
Republic Day Parade Live Streaming: घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कधी अन् कुठे पाहता येणार? घ्या जाणून

चित्ररथाच्या समोर हातात दीवजां घेतलेली एक स्त्री दाखवली जाणार आहे. याशिवाय आम्ही आग्वादचा किल्ला देखील बनवला असल्याची माहिती पूर्णानंद पैदारकर यांनी गोमंतक टाइम्सला दिली.

सागर नाईक-मुळे हे गोव्यातील एक प्रसिद्ध कावी कलाकार आहेत, जे महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन या चित्ररथाच्या घडवणुकीसाठी गोव्याची लालमाती घेऊन दिल्लीसाठी रवाना झालेत. गोव्याला संगीताचा जुना वारसा लाभला आहे आणि संगीत हे देखील यंदाच्या चित्ररथत मोठी भूमिका बजावेल. परेडमध्ये डॉ. साईश देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले एक खास गाणे सादर केले जाईल. 'या या गोयां या' या ४९-सेकंदाच्या गाण्यात गोव्यातील महिलांनी गायलेल्या ओव्याचे सूर दिवजांसोबत जोडले गेलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com