Republic Day 2025 Speech: प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या हे सोपं आणि छोटं भाषण, प्रेक्षक करतील कौतुक

Republic Day 2025 Speech In Marathi : 26 जानेवारी 2025 भारत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा दिवस भारतीयांसाठी खूप महत्तवाचा आहे.
Republic Day 2025
Republic Day 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day 2025

26 जानेवारी 2025 भारत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा दिवस भारतीयांसाठी खूप महत्तवाचा आहे. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणं, देशभक्तीवर गीते, एन सी सी परेड तसंच स्काऊट गाईड पथक परेड अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाची तयारी करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी सोपं आणि छोटं भाषण चे सहज पाठ होईल, अशा काही टिप्स देणार आहोत. या टिप्स वापरुन तुम्ही शाळा, महाविद्यालयांमध्ये किंवा ईतर कोणत्याही ठिकाणी भाषण देऊ शकता.

Republic Day 2025
Goa Politics: गोवा काँग्रेस सरकारला घेरण्यात अपयशी; दोन वर्षांत एकही अहवाल नाही, नामी संधी घालवल्याने विरोधक नापास

प्रजासत्ताक दिनासाठी भाषण

आदरणीय प्रमुख अतिथी, शिक्षकगण, मान्यवर आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

आज आपल्यासाठी अत्यंत गौरवशाली दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन! सर्वप्रथम, मी आपले मनःपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला या महान राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

26 जानेवारी 1950 हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ऐतिहासिक होता. या दिवशी आपल्या देशाने संविधान लागू करून एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्व प्राप्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यासाठी एक मजबूत आणि लोकशाहीप्रधान संविधान दिले, ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले.

Republic Day 2025
Goa BJP: 4 वर्षे भाजप कार्यालयाकडे न फिरकलेले 'दामूं'च्या निवडीनंतर सक्रिय; दिल्‍ली दौऱ्यामुळे उंचावल्‍या अनेकांच्‍या अपेक्षा

प्रजासत्ताक म्हणजे काय?
प्रजासत्ताक म्हणजे जनतेच्या हातात सत्ता असलेला देश. भारतीय संविधान आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे संरक्षण देतो. प्रत्येक नागरिकाला शिक्षण, विचारस्वातंत्र्य आणि संधी मिळाव्यात, यासाठी संविधानाने व्यवस्था केली आहे.

आपली जबाबदारी
आज, देश प्रगतीच्या मार्गावर आहे. पण आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. आपण सर्वांनी आपले संविधान, स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदाने आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, पर्यावरणसंवर्धन आणि सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नवीन भारताचा संकल्प
युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये प्रगती करून भारताला जागतिक स्तरावर नेतृत्त्व प्रदान करावे. देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध राहावे. चला, आपण सर्व आज या प्रजासत्ताक दिनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याची शपथ घेऊ!

"जय हिंद! जय भारत!"

भाषणाच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभारही मानले पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com