Republic Day 2025: दिवजोत्सव, कावी आर्ट आणि पर्यटनाची अनोखी सांगड; असा असेल गोव्याचा चित्ररथ

Goa Tableau in Republic Day: गोव्याशिवाय आणखीन १५ राज्ये, केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारची ११ मंत्रालये आणि विभाग सहभागी होतील
Republic Day 2025| Republic Day Parade | Red Fort Delhi | Goa Tableau
Republic DayDainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day Parade Goa Tableau 2025

पणजी : यंदाचा प्रजासत्ताकदिन गोव्यासाठी आणखीन खास असणार आहे, कारण यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्ररथ उतरणार आहे. दोन वर्षांनंतर गोवा पुन्हा एकदा दिल्लीत चित्ररथाचे सादरीकरण करेल. यंदाच्यावर्षी 'स्वर्णिम भारत - विरासत और विकास' अशी थीम ठेवण्यात आली आहे, ज्यात ज्यात गोव्याशिवाय आणखीन १५ राज्ये, केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारची ११ मंत्रालये आणि विभाग सहभागी होतील.

गोवा यंदाच्या चित्ररथामधून ‘विरासत’ आणि ‘विकास’ यांच्यातील समतोल सादर करेल. यात ‘स्वर्णिम गोवा - विरासत और विकास’ या संकल्पनेतून गोव्याचे चित्रीकरण केले जाईल. फोंड्यातील सुशांत खेडेकर यांच्याकरवी गोव्याच्या चित्ररथाला आकार दिला जाईल.

Republic Day 2025| Republic Day Parade | Red Fort Delhi | Goa Tableau
Republic Day 2025: अभिमान! दिल्लीतील संचलनासाठी गोव्याचा सिद्धेश साकारणार दोन चित्ररथ

गोव्याच्या सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करून दाखवणारी पवित्र दिवाजांची मिरवणूक या चित्ररथाचे प्रमुख आकर्षण असेल याशिवाय गोव्याचा कलात्मक वारसा म्हणजेच कावी कलाकृती देखील गोव्याच्या अद्वितीय संस्कृतीचे दर्शन घडवेल.

गोवा हा पर्यटनाशिवाय अपूर्ण असल्याने चित्ररथात पर्यटनाला देखील प्राधान्य दिलं जाईल. गोवा पर्यटनातील प्रमुख घटक म्हणजे जलक्रीडा, लग्नाची ठिकाणे आणि ऐतिहासिक आकर्षण असलेला आग्वादचा लाइटहाऊस चित्ररथमधून संपूर्ण देश पाहणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील गोव्याचा चित्ररथ राज्याचा सांस्कृतिक वारसा आणि प्रगतीचे अप्रतिम प्रदर्शन घडवून आणेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com