Kiran Kandolkar
Kiran Kandolkar Dainik Gomantak

Goa Lok Sabha Election 2024: लोकसभेवेळी राजकीय पक्षाला नव्हे, उमेदवाराला पाठिंबा : किरण कांदोळकर

‘माझ्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा निरर्थक’ : कांदोळकर
Published on

Goa Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाला नव्हे, उमेदवाराला माझा पाठिंबा असेल. थिवीमधील माझ्या कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसारच मी भूमिका घेईन.

लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी असून आताच भविष्यवाणी करून काहीच उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार किरण कांदोळकर यांनी व्यक्त केली. सोमवारी ते कोलवाळमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Kiran Kandolkar
Goa ST Reservation: ... एसटी समाज आक्रमक, लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असो, मुळात लोकसभेचा उमेदवार कोण असेल यावर माझी भूमिका राहील.

आमचा पूर्णतः पाठिंबा हा उमेदवाराच्या चेहऱ्यालाच असेल. सध्या सर्वच राजकीय पक्षाच्या विश्वासार्ह्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कारण अलीकडे लोकप्रतिनिधी निवडणूक जिंकल्यानंतर पक्षांतर करतात. त्यामुळे लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे, असे म्हणत कांदोळकरांनी विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले.

गोव्यात पाठिंबा देण्यासारखा एकही राजकीय पक्ष नाही का? यावर उत्तर देताना कांदोळकरांनी सध्या असा पक्ष गोव्यात खरंच उरला आहे का? असा प्रतिसवाल उपस्थित केला.

Kiran Kandolkar
Goa ST Reservation: गोव्यात एसटी आरक्षणावरून तणाव; मडकईकर म्‍हणतात, बहिष्काराचा निर्णय नव्‍हताच!

‘माझ्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा निरर्थक’

माझी कार्यकर्त्यांसोबत भूमिकेसंदर्भात बैठक झाली आहे. त्यामुळे वेळेनुसार लोकसभा उमेदवार पाहून मी भूमिका घेईन. अद्याप वेळ आलेली नाही.

राजकारणात वेळोवेळी फक्त अफवा व चर्चांना उधाण असते. त्यामुळे मी अमुक किंवा तमुक पक्षात प्रवेश करणार आहे, अशा बातम्यांना अर्थ नाही. कारण मी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही, असे किरण कांदोळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com