Khair Wood Smuggling: वारखंड पेडणे येथे खैर लाकडाची तस्करी उधळली; व्हॅनसह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त, सिंधुदुर्गातील संशयिताला अटक

Khair Wood Smuggling In Pernem: वारखंड येथे खैराच्या झाडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर पेडणे वन विभागाने कारवाई केली.
Khair Wood Smuggling In Pernem
Khair Wood SmugglingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: वारखंड येथे खैराच्या झाडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर पेडणे वन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ६० हजार रुपये किमतीचे खैराच्या झाडाचे ओंडके आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली व्हॅन जप्त करण्यात आली. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे येथील सोनू वरक याला अटक करण्यात आली आहे.

पेडणे वन विभागाचे अधिकारी हरीश महाले हे वनपाल सुनील नाईक, विष्णू सावंत, स्नेहल साळगावकर, जितेंद्र नाईक, अविनाश परब आणि नागेश वरक यांच्यासोबत गस्तीवर होते. त्यावेळी वारखंड येथे जीए-०३-पी-९४५८ क्रमांकाची व्हॅन संशयास्पदरीत्या जाताना आढळून आली. वन विभागाच्या पथकाने वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये खैराच्या झाडाचे ओंडके आढळून आले.

Khair Wood Smuggling In Pernem
Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनातील लाकडाच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना आणि कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधित व्यक्तीला आवश्यक परवाना सादर करता आला नाही. त्यामुळे वन विभागाने तत्काळ कारवाई करीत वाहनासह खैराचे ओंडके ताब्यात घेतले. याप्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून सोनू वरक याला अटक करण्यात आली. आरोपी हा ओंडके घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कातासाठी खैराची ‘कटाई’!

खैराच्या लाकडापासून कात तयार केली जाते आणि त्याला बाजारात चांगला दर मिळतो. त्यामुळे या लाकडाची बेकायदेशीर तोड व वाहतूक करणाऱ्यांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय आहे. वारखंड येथे वन विभागाने केलेल्या कारवाईत ओमनीसह सुमारे ६० हजार रुपयांचे खैराचे ओंडके जप्त करून एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईमुळे खैराच्या अवैध वाहतुकीचा माग काढण्याची संधी वन विभागाला मिळाली आहे.

Khair Wood Smuggling In Pernem
Goa Drug Case: लायबेरियन ड्रग्स संशयिताचा जामीन पाचव्यांदा नाकारला; गुन्हेगारी पार्श्वभूमीही न्यायालयाने तपासली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Best Places to Visit in Sindhudurg
Dead body found in canal in Sindhudurg
Kunal Thakur Disability Achievements
Mark Wood Retirement From International Cricket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com