'फेक' पेमेंट दाखवून दागिने लुटले, अन् चोरीच्या पैशांवर गोव्यात 'नाईटलाईफ'ची मजा; कळंगुटच्या पबमधून केरळच्या भामट्याला बेड्या

Kerala Gold Thief Arrested In Goa: दागिने चोरून आणि दुकानदाराची फसवणूक करून गोव्याच्या नाईटलाईफची मजा लुटणाऱ्या एका ३४ वर्षीय आरोपीला गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Kerala Gold Thief Arrested In Goa
Kerala Gold Thief Arrested In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

केरळमध्ये सोन्याचे दागिने चोरून आणि दुकानदाराची फसवणूक करून गोव्याच्या नाईटलाईफची मजा लुटणाऱ्या एका ३४ वर्षीय आरोपीला गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कळंगुट येथील एका प्रसिद्ध पार्टीच्या ठिकाणी गोवा पोलिसांनी ही धडक कारवाई केली. अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा केरळचा रहिवासी असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी केरळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बनावट ऑनलाइन पेमेंट दाखवून केली होती चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची नोंद केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील बेकल पोलीस ठाण्यात झाली होती. आरोपीने केरळमधील एका नामांकित सराफा दुकानात जाऊन सोन्याच्या अंगठ्या आणि नेकलेससह अनेक महागडे दागिने खरेदी करण्यासाठी निवडले. दागिने हातात आल्यानंतर, त्याने दुकानदाराला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचा एक खोटा (बनावट) मेसेज आणि कन्फर्मेशन स्क्रीन दाखवली. दुकानदार काही समजण्याच्या आतच आरोपी दागिने घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता.

Kerala Gold Thief Arrested In Goa
Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

कॅसिनो आणि पार्टी वेन्यूवर पोलिसांची करडी नजर

गुन्हा केल्यानंतर आरोपी गोव्यात पळून गेल्याची आणि तो तेथील कॅसिनो किंवा मोठ्या पार्ट्यांमध्ये चोरीचे पैसे उडवण्याची दाट शक्यता असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व प्रमुख कॅसिनो आणि हाय-फाय पार्टी वेन्यूच्या व्यवस्थापनाला आधीच सतर्क केले होते, तसेच आरोपीचे वर्णन आणि फोटो त्यांच्याशी शेअर केले होते.

Kerala Gold Thief Arrested In Goa
Goa Fishing Season: दहा दिवसांपूर्वीच बोटी धक्क्यावर! यंदा मासळी कमीच, हंगामाची आज सांगता; मजूरही परतले गावाला

३० मे च्या रात्री कलंगुटमध्ये रंगेहात पकडले

३० मे रोजी पोलिसांना पक्का सुगावा लागला की, हा आरोपी कळगुटमधील एका मोठ्या पार्टीत हजेरी लावणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला. पार्टी सुरू असतानाच पोलिसांनी संशयित व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले.

कसून चौकशी केली असता, तो केरळमधील गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गोवा पोलिसांनी त्याला अटक करून केरळ पोलिसांच्या पथकाकडे सोपवले असून, आता चोरीला गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com