Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

Baga Road Tourist Car Stunt Video: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या रस्त्यांवर सध्या पर्यटकांकडून नियम धाब्यावर बसवून स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
Goa Tourist Car Stunt
Goa Tourist Car StuntDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या रस्त्यांवर सध्या पर्यटकांकडून नियम धाब्यावर बसवून स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असाच एक अत्यंत धक्कादायक आणि बेजबाबदारपणाचा प्रकार गोव्यातील प्रसिद्ध बागा रोडवर समोर आला आहे. येथील रस्त्यावरून धावणाऱ्या एका कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये काही तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवास करताना दिसत आहेत. या व्हिडिओने रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

एकाच कारमध्ये १० तरुण; दोघे चक्क डिकीच्या आत

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका छोट्या कारमध्ये जवळपास १० तरुण खचाखच भरलेले दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कारच्या आत जागा नसल्यामुळे दोन तरुणांना चक्क कारच्या मागे असलेल्या डिकीमध्ये बसवण्यात आले होते.

चालू गाडीत डिकीचा दरवाजा उघडा ठेवून हे तरुण अत्यंत धोकादायक स्थितीत प्रवास करत होते. जर चालकाने अचानक ब्रेक लावला असता किंवा पाठीमागून येणाऱ्या एखाद्या वाहनाने धडक दिली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, या धोक्याची पुसटशीही कल्पना या तरुणांना नसल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

Goa Tourist Car Stunt
Goa Fishing Season: दहा दिवसांपूर्वीच बोटी धक्क्यावर! यंदा मासळी कमीच, हंगामाची आज सांगता; मजूरही परतले गावाला

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गोव्यातील स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बागा रोडवर नेहमीच पर्यटकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या रस्त्यावर अशा प्रकारे जीवघेणे स्टंट करणे केवळ स्वतःच्याच नव्हे, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.

Goa Tourist Car Stunt
Goa Job Scam: सरकारी नोकरीचा लोभ; गमावले 10 लाख रुपये, फोंडा पोलिसांत तक्रार दाखल

पोलिस कारवाईची मागणी आणि सुरक्षेचा प्रश्न

आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र आहे. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे, हे विसरून अशा प्रकारे स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांना चाप बसवणे आवश्यक झाले आहे. याप्रकरणी आता पोलीस संबंधित कारच्या नंबरवरून कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com