Kavita Manoj Nair: मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य झालं गोव्यात स्थायिक, पैसा नव्हे तर 'हे' आहे कारण

Parijaat Goa Homestay: कविता वोडाफोन कंपनीत तर मनोज यांनी एचडीएफसी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. हणजूण येथे या दाम्पत्याने 'पारिजात' होमस्टेची उभारणी केली.
Kavita Manoj Nair: मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य झालं गोव्यात स्थायिक, पैसा नव्हे तर 'हे' आहे कारण
Kavita and Manoj Nair | Parijaat Goa HomestayDainik Gomantak
Published on
Updated on

Kavita Manoj Nair Mumbai Couple Build Homestay In Goa

हणजूण: घडाळाच्या काट्यावर धावणारे आयुष्य, लोकलचा प्रवास, जीवघेणी गर्दी आणि दूरवर पसरलेले सिमेंटचे जंगल. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडावं आणि निसर्गाच्या सानिध्यात रहावं अशी प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. पण, मुंबईला कायमचा रामराम ठोकून गोव्यासारख्या निसर्गसंपन्न राज्यात राहण्याचा निर्णय नायर दाम्पत्याने घेतला. भरगोस पगाराची नोकरी सोडून त्यांनी गोव्यात निसर्गच्या कुशीत होमस्टे उभारला आणि गोमंतकीय होण्याचा निर्णय घेतला.

कविता आणि मनोज नायर यांनी सुमारे १४ वर्षापूर्वी गोव्यात हणजूण येथे मोडके असलेल्या घर आणि सभोवतालची जमीन खरेदी केली. त्यावेळी या जागेची अवस्था अतिशय दयनीय होती. नायर दाम्पत्याने २०२० साली मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून कायमचे गोव्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. कविता वोडाफोन कंपनीत तर मनोज यांनी एचडीएफसी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. हणजूण येथे या दाम्पत्याने 'पारिजात' होमस्टेची उभारणी केली.

Kavita Manoj Nair: मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य झालं गोव्यात स्थायिक, पैसा नव्हे तर 'हे' आहे कारण
Goa Governor: पंडित नेहरुंना गोव्याचा बळी द्यायचा होता का, स्वातंत्र्याला 14 वर्ष उशीर का झाला? राज्यपाल पिल्लई यांचा सवाल

नायर दाम्पत्याने परिसराची स्वच्छता करुन आरामदायी परिजात होमस्टेची उभारणी केली. मुलीचे बालपण आणि मन:शांतीला प्राधान्य देत त्यांनी होमस्टे उभारले. होमस्टेच्या परिसरात माडाची झाडे, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला, फुलझाडे आणि औषधोपयोगी झाडांची लागवड केली आहे. पर्यटकांना येथे निसर्गरम्य वातावरणात राहण्याचा आनंद मिळतो.

Kavita Manoj Nair: मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य झालं गोव्यात स्थायिक, पैसा नव्हे तर 'हे' आहे कारण
RCM Tea: दर 600 रु/किलो, दर्जा - शून्य; गोव्यातल्या 'रिपोर्ट'नंतर राजस्थानमध्ये ११ हजार किलो चहा पॉवडर जप्त

सभोवताली हिरवागार निसर्ग, माडांची झाडे, निरव शांतता आणि मन प्रसन्न करणारे वातावरण. या ठिकाणवरुन मनमोहक सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन होते. गेल्या चार वर्षापासून नायर दाम्पत्य या होमस्टेसाठी आवश्यक सर्व गोष्टींसाठी मेहनत घेत आहेत. याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये देखील वेगळा उत्साह पाहायला मिळतो.

Kavita Manoj Nair: मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य झालं गोव्यात स्थायिक, पैसा नव्हे तर 'हे' आहे कारण
Viral Video Goa: मेरे करण अर्जुन आएंगे! प्रश्न विचारताच सलमान - शाहरुखच्या फिल्मी आईने हातच जोडले, म्हणाली Please...

होमस्टेच्या घरांची आतील रचना अतिशय क्रिएटीव्ह पद्धतीने करण्यात आली आहे. बेड, बेसिन, डिनर टेबल, बेडरुम, खिडक्या, भिंतींवर केलेल्या कलाकृती, बाल्कनी यांची रचना कलात्मक पद्धतीने करण्यात आलीय. होमस्टेची साध्या पद्धतीने पर्यटकांच्या पसंतीस उतरेल अशी रचना करण्यात आल्याची माहिती नायर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

पारिजात होमस्टेमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ देखील उत्कृष्ट दर्जाचे असतात, असे नायर दाम्पत्य सांगतात. पारिजात होमस्टे पर्यटकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. गेल्या पाच वर्षात पर्यटकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो, असे नायर सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com