RCM Tea: दर 600 रु/किलो, दर्जा - शून्य; गोव्यातल्या 'रिपोर्ट'नंतर राजस्थानमध्ये ११ हजार किलो चहा पॉवडर जप्त

Tea fraud in Goa and Rajasthan: कंपनीने विक्रीसाठी सप्लाई केलेली चहापत्ती देखील माघारी बोलावण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
RCM Company Tea Powder Seized in Rajastan
RCM Company Tea Powder Seized in RajastanDainik Gomantak
Published on
Updated on

RCM Company Tea Powder Seized

राजस्थान: आरसीएम कंपनीची निकृष्ट दर्जाची तब्बल ११ हजार किलो चहा पॉवडर जप्त करण्यात आली आहे. चहा पॉवरडचे गोव्यात नमूने तपासण्यात आले. चहा पॉवडरचा दर्जा खराब असल्याची माहिती गोवा सरकारने राज्यस्थान सरकारच्या आरोग्य विभागाला दिल्यानंतर भीलवाडा येथील फॅक्टरीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

राजस्थानचे मुख्य आरोग्य अधिकारी चेतेंद्र पुरी गोस्वामी यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, आरसीएम उद्योग समुहाच्या वातीने विविध खाद्यपदार्थांची विक्री केली जाते यात चहा पॉवरडचा देखील समावेश आहे. कंपनीच्या चहा पॉवडरचे गोव्यात तपासणीसाठी नमूने घेण्यात आले. चाचणी चहा पॉवडर खराब असल्याचे उघडकीस आल्याची माहिती गोवा सरकारकडून मिळाली.

RCM Company Tea Powder Seized in Rajastan
Viral Video Goa: मेरे करण अर्जुन आएंगे! प्रश्न विचारताच सलमान - शाहरुखच्या फिल्मी आईने हातच जोडले, म्हणाली Please...

भिलवाडा, राजस्थान (Bhilwara Rajasthan) येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरसीएम कंपनीच्या परिसरात छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी कंपनीची तब्बल ११,००० किलो निकृष्ट दर्जाची चहा पॉवडर जप्त केली. कंपनीने विक्रीसाठी सप्लाई केलेली चहापत्ती देखील माघारी बोलावण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

RCM Company Tea Powder Seized in Rajastan
Rohan Harmalkar: जीवे मारण्याची धमकी, मारहाण प्रकरण; 'मगो' नेत्याला एका दिवसात जामीन

आरसीएम उद्योग समुहाची विविध उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कंपनी जियो लाईट प्रीमियम चहा पॉवडर ६०० रुपये प्रति किलो दराने विक्री करते. दराने महागड्या असणाऱ्या चहा पॉवडरचा दर्जा मात्र खराब असल्याचे या कारवाईमुळे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com