Kavale Fire News: चहासाठी भांडे ठेवले, आग भडकून घर पेटले; कवळेतील दुर्घटनेत मायलेक गंभीर जखमी

Kavale Fire Incident: कवळे येथे एका घराला आग लागून मायलेक जखमी झाले आहेत. भाजल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Kavale Fire News
Kavale Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कवळे येथे एका घराला आग लागून मायलेक जखमी झाले आहेत. भाजल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीत घराचेही मोठे नुकसान झाले आहे.

मनरथी नाईक (वय ६९) आणि गौरेश नाईक (वय ३५) अशी दोघांची नावे आहेत. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गाळशिरे-कवळे येथील मनरथी नाईक यांच्या घराला शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली.

Kavale Fire News
Colvale House Fire: कोलवाळमध्ये भीषण आग! क्षणार्धात घर जळून खाक, 7 लाखांचं नुकसान

मनरथी नाईक आजारी असून ती घरातच झोपल्या होत्या. अमित नाईक या मुलाने चहा करण्यासाठी चुलीवर भांडे ठेवले आणि लाकडे पेटवली. त्यावेळी आग अचानक भडकून जवळच साठवून ठेवलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्याला लागली.

Kavale Fire News
Davorlim Saw Mill Fire: दवर्लीत भीषण आग! सॉ मिल जळून खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

आग भडकल्याने स्थानिकांनी बाहेर असलेल्या मोठा मुलगा गौरेश याला कळवल्यानंतर त्याने धाव घेऊन आगीच्या लपेट्यातून आईला बाहेर काढले. त्यात गौरेश आणि मनरथी भाजल्या. अमितने पळ काढल्याने तो बचावला. दोघांवरही उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com