Goa Boat Accident: कारवारची मच्छीमारी बोट बेतुल समुद्रात बुडाली!२२ जणांना वाचविले: इतर बोटीतील मच्छीमारांची धाडसी कामगिरी

Karwar Fishing Boat Sinks Goa: खोल समुद्रात मासेमारी करून कर्नाटकात परत जात असलेली कारवारच्या मच्छीमारांची पर्शियन बनावटीची एक मासेमारी बोट गोव्याच्या किनारपट्टी भागात रविवारी रात्री बुडाली.
Karwar Fishing Boat Sinks Goa
Karwar Fishing Boat Sinks GoaDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: खोल समुद्रात मासेमारी करून कर्नाटकात परत जात असलेली कारवारच्या मच्छीमारांची पर्शियन बनावटीची एक मासेमारी बोट गोव्याच्या किनारपट्टी भागात रविवारी रात्री बुडाली. सुदैवाने या बोटीजवळच असलेल्या दुसऱ्या बोटीतील मच्छीमारांनी या बोटीवरील २२ जणांना जीवनदान देण्यात यश मिळविले. ही घटना गोव्याच्या बेतुल किनारपट्टी भागाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवारमधील मुडगा येथील दिनेश कांचन यांच्या मालकीची ‘श्री अम्मा’ नावाची बोट सुमारे आठवडाभरापूर्वी मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेली होती. समुद्रात बुडण्यापूर्वी बोटीत तांत्रिक बिघाड झाला होता.जवळच्या मच्छीमारांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि बोटीवरील सर्व २२ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या बोटींमध्ये हलवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मच्छीमार समुदाय आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळालाआहे.

Karwar Fishing Boat Sinks Goa
Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

स्थानिक मच्छीमारांनी बोटमालक आणि कामगारांना नुकसान भरपाई आणि तात्काळ मदत देण्याची प्रशासनाला विनंती केली आहे. या घटनेमुळे पश्चिम किनारपट्टीवरील अनिश्चित सागरी परिस्थितीत खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भेडसावणारे धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

बोटमालकाचे मोठे नुकसान

मासेमारी बोट बुडाल्याने मालक आणि कामगारांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडी मासेमारीची जाळी, उपकरणे आणि बोट पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com