Video
Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप
Thivim Accident: उत्तर गोव्यातील थिवी परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात घडला. एका भरधाव चारचाकी चालकाने समोरुन येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.
उत्तर गोव्यातील थिवी परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात घडला. एका भरधाव चारचाकी चालकाने समोरुन येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एका दुर्दैवी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही चारचाकी गाडी वेगाने थिवीच्या मुख्य रस्त्यावरुन जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींवर जाऊन आदळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.