'कर्नाटकातील कामगार, स्थलांतरितांना गोवा पोलिसांकडून त्रास, त्यांना संरक्षण द्या'; काँग्रेस मंत्र्यांची CM सावंतांकडे मागणी

Santosh Lad Meet Goa CM: सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना मिळत नसल्याचे आढळून आले आहे, असे लाड यांनी निवेदनात म्हटले आहे.
Minister Santosh Lad Meets Goa CM Produce Letter
Karnataka Minister Santosh Lad Meets Goa CMDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Minister Santosh Lad Meets Goa CM Pramod Sawant

पणजी: "कर्नाटकातील कामगार आणि स्थालांतरितांना पोलिसांपासून संरक्षण द्या. तसेच, त्यांना आरोग्य, रेशन यासारख्या सुविधा मिळाव्यात", अशी मागणी कर्नाटकचे कामगार कल्याण मंत्री संतोष लाड यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्याकडे केली आहे. लाड यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री सावंत यांना पणजीत रविवारी (१६ फेब्रुवारी) भेट घेऊन दिले.

कर्नाटकमधून गोव्यात रोजगारासाठी आलेल्या स्थलांतरीत कामगारांना राज्यात विविध त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा पोलिस आणि स्थानिक संस्थांकडून छळ सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक सुरक्षा साधनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. तसेच, सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळत नसल्याचे आढळून आले आहे, असे लाड यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Minister Santosh Lad Meets Goa CM Produce Letter
Forced Religious Conversions: गरिब लोकांना धर्मांतर करण्यासाठी 25 हजारांचे आमिष; गोवा, तामिळनाडू, पुद्दुचेरीतील धर्मोपदेशकांना राजस्थानमध्ये अटक

कर्नाटकातील कामगारांना सबसिडीचे रेशन आरोग्य सुविधा आणि विविध योजनांचा लाभ मिळावा, अशी विनंती वजा मागणी लाड यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली. कर्नाटकातील कामागारांचे पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणांपासून होणारी छळवणूक थांबवावी, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.

Minister Santosh Lad Meets Goa CM Produce Letter
Bodgeshwar Temple: ‘बोडगेश्‍वर’ नवनिर्वाचित समितीचे भवितव्य न्यायालयाच्या हातात, 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी

गोवा आणि कर्नाटकमध्ये विशेष बंध आहेत. दोन्ही राज्य त्यांच्या आधारातिथ्यासाठी ओळखले जातात. गोव्याच्या प्रगती आणि विकासासाठी योगदान देणाऱ्या कर्नाटकातील कामगारांना संरक्षण द्यावी, अशी मागणी मंत्री लाड यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com