Forced Religious Conversions: गरिब लोकांना धर्मांतर करण्यासाठी 25 हजारांचे आमिष; गोवा, तामिळनाडू, पुद्दुचेरीतील धर्मोपदेशकांना राजस्थानमध्ये अटक

Forceful Religious Conversion: हिंदू संघटनेल्या माहितीनुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, येशूची प्रार्थना सुरु असल्याचे आढळून आले.
Rajasthan conversion racket
CrossDainik Gomantak
Published on
Updated on

forced religious conversions

राजस्थान: सक्तीच्या धर्मांतरणप्रकरणी बिकानेर येथून ख्रिस्ती धर्मोपदेशकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले धर्मोपदेशक तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि गोव्यातून बिकानेरला आल्याचे उघड झाले आहे. बीकानेरच्या मुक्ता प्रसाद पोलिसांनी रविवारी (१६ फेब्रुवारी) ही कारवाई केली.

प्रार्थना सभेच्या नावाखाली बांगला नगर भागातील एका घरात धर्मांतरण सुरु असल्याची माहिती हिंदू संघटनांना मिळाली. घटनेची माहिती संघटनेच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. मुक्ता प्रसाद येथील पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सुरु असलेल्या बेकायदेशीर धर्मांतरणाचा प्रयत्न हाणून पाडला, असे वृत्त एका नामांकित हिंदी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

Rajasthan conversion racket
Lavoo Mamledar: आठवांचा गहिवर, अश्रू अनावर! लवू मामलेदार अनंतात विलीन; फोंड्यात अंत्यसंस्कार

वृत्तात दिलेल्या अधिक माहितीनुसार, बांगला नगर भागातील एका भाड्याच्या घरात अनेक लोक जमले होते. याठिकाणी काहीतरी बेकादेशीर सुरु असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचचे कार्यकर्त्यांना मिळाली. हिंदू संघटनेल्या माहितीनुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, येशूची प्रार्थना सुरु असल्याचे आढळून आले. तसेच, कार्यकर्त्यांनी सुरु असलेल्या धर्मांतरणाला विरोध केला.

दरम्यान, संबधित घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि गोव्यातून आलेल्या धर्मोपदेशकांना अटक केलीय. पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

Rajasthan conversion racket
Lavoo Mamledar: न पटल्यावर ताठ मानेने बैठकीचा निरोप घेणारे 'लवू'! राजकारणात परतण्याचे स्‍वप्‍न राहिले अधुरेच

धर्मांतरासाठी काही लोकांना 20-25 हजार रुपये देण्याचे आमिष देण्यात आले होते. घटनास्थळी आलेल्या अनेकांकडे परत जाण्यासाठीही पैसे नव्हते अशी माहिती आहे. यावेळी येथे अंत्योदय नगर, बांगलानगर, इंद्रा कॉलनी, मुक्ता प्रसाद कॉलनी, उदासर येथील रहिवासी उपस्थित होते आणि यातील बहुतांश गरीब कुटुंबातील आहेत, अशी माहिती वृत्तात देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com